Solar Agriculture Scheme : ‘सौरकृषी’मुळे मिळणार दिवसा वीज

Daytime Electricity : या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा भरवशाचा वीजपुरवठा होण्यासोबत स्वस्तात वीज उपलब्ध झाल्याने उद्योगांवरील क्रॉस सबसिडीचा बोजा कमी करण्याची संधी भविष्यात मिळणार आहे.
Agriculture Solar Scheme
Agriculture Solar Scheme Agrowon
Published on
Updated on

Nashik News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ऊर्जा क्षेत्रातील परिवर्तनासाठी आणलेल्या सौर कृषी वाहिनी योजना २.० च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवस वीज पुरवठा मिळत असून, ही जगातील सर्वात मोठी विकेंद्रित सौर निर्मिती योजना असून, यामुळे आगामी काळात राज्यासह जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले.

जिल्ह्यातील शिरूर तांगडी (ता. चांदवड) येथील ६ मेगावॉटच्या सौर प्रकल्पास नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी बुधवारी (ता. २६) रोजी भेट देऊन पाहणी केली. या वेळी ते बोलत होते.

याप्रसंगी महावितरणच्या नाशिक मंडळाचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, प्रांताधिकारी कैलास कडलग, तहसीलदार मंदार कुलकर्णी, चांदवड विभागाचे कार्यकारी अभियंता केशव काळूमाळी, स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता नीलेश चालीकवार, टोरन्ट पॉवरचे प्रतिनिधी, शिरूर तांगडीच्या सरपंच पूनम अमोल जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते.

Agriculture Solar Scheme
Agriculture Solar Scheme : मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजनेचा राष्ट्रीय सन्मान

जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले, की शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणच्या माध्यमातून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत राज्यासह नाशिक जिल्ह्यात सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहे. शिरूर तांगडी येथील ६ मेगावॉटच्या या प्रकल्पातून सद्यःस्थितीत ५ मेगावॉट सौरऊर्जा निर्मिती होत आहे.

Agriculture Solar Scheme
Solar Pump Scheme: पैसे भरूनही मिळेना सौरपंप; अडीच लाख शेतकरी प्रतीक्षेत

या प्रकल्पामुळे या भागातील २ हजार ४६० शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे. चांदवड तालुक्यातील शिरूर तांगडी येथील सरपंचांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मुख्यमंत्री सौर प्रकल्पासाठी उपलब्ध करून दिलेल्या जागेवर हा सौर प्रकल्प उभारण्यात आला असून विजेची निर्मिती सुरू झाली आहे.

ग्रामपंचायत, ग्रामस्थ व सरपंच यांचा पुढाकार पाहून जिल्हाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले तसेच इतर ग्रामपंचायती व सरपंचांनी याचा आदर्श घेऊन सौर प्रकल्प निर्मितीस जागा देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शर्मा यांनी केले.   

या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा भरवशाचा वीजपुरवठा होण्यासोबत स्वस्तात वीज उपलब्ध झाल्याने उद्योगांवरील क्रॉस सबसिडीचा बोजा कमी करण्याची संधी भविष्यात मिळणार आहे. या योजनेमुळे कृषी क्षेत्राला मोलाची मदत करण्यासोबतच उद्योगांनाही प्रोत्साहन मिळणार, असल्याचे प्रतिपादन अधीक्षक अभियंता पडळकर यांनी या वेळी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com