Seed Distribution : रायगड जिल्ह्यात मोफत बियाणे वाटपाला ब्रेक

Free Seeds Distribution : नाचणी, वरई, तूर या पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप करण्यात येणार आहेत. मात्र, सध्या सुरू असलेल्या आचारसंहितेमुळे कृषी विभागाला बियाणांचे वाटप करता येत नाहीत.
Seeds
SeedsAgrowon

Alibaug News : नाचणी, वरई, तूर या पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप करण्यात येणार आहेत. मात्र, सध्या सुरू असलेल्या आचारसंहितेमुळे कृषी विभागाला बियाणांचे वाटप करता येत नाहीत. पेरण्या होण्यापूर्वी बियाणे वाटप होणे आवश्‍यक असल्‍याने शेतकऱ्यांकरिता आचारसंहिता शिथिल करावी, अशी मागणी जिल्हा कृषी विभागाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

काही दिवसांतच रायगड जिल्ह्यात खरीप हंगामासाठी पेरण्या सुरू होतील. येथील मातीत रुजणाऱ्या परंतु शेतकऱ्यांचा फारसा प्रतिसाद नसलेल्या पिकांच्या उत्पादन वाढीसाठी कृषी विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत १० हजार शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप करण्यात येणार आहे. नाचणी, वरई, तूर आणि ज्यांच्याकडे भाताची बियाणे शिल्लक नाही, अशा शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून बियाणे मोफत दिले जाते.

Seeds
Plant Seed Distribution : आषाढवारीत वारकऱ्यांना देशी वृक्ष बीजाचे वाटप

पेरणीचा हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपल्‍याने विविध कंपन्यांची नियमित बियाणे वितरकांकडे पोच झाली आहेत. १०० टक्के मोफत अनुदानित बियाणे मिळण्यास विलंब होत आहे. या समस्येवर मार्ग काढावा, यासाठी कृषी विभागाने निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे. मोफत बियाणे वाटपाचा लाभ रायगड जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांना मिळणार असला तरी ते केव्हा उपलब्‍ध होणार, याची प्रतीक्षा आहे.

खरिपासाठी २० हजार टन खतांची मागणी

पुणे जिल्ह्यात १ लाख १ हजार ५१० हेक्टरवर यंदा खरिपाची लागवड करण्याचे उद्दिष्ट असून त्‍यासाठी २० हजार मेट्रीक टन खतांची मागणी सरकारकडे रायगड जिल्हा कृषी विभागाने केली आहे. यात प्रामुख्याने ९८ हजार ४८७ हेक्टरवर भाताची लागवड केली जाणार आहे. तर ३ हजार ०२३ हेक्टरवर नाचणी लागवडीचे उद्दिष्ट आहे. गतवर्षी ९० हजार हेक्टरवर भाताची लागवड करण्यात आली होती.

Seeds
Tur Seed : तुरीच्‍या बियाणेदरांना यंदा ‘फोडणी’

फार्म हाऊसमध्ये नाचणी लागवड

तृणधान्य वर्ष म्हणून गतवर्षी नाचणीच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले. यंदा जिल्ह्यातील फार्महाऊसमध्ये नाचणीची लागवड करण्याच्या सूचना जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाने केल्या आहेत. जिल्ह्यात फार्महाऊस मोठ्या प्रमाणात आहेत.

भात बियाणे : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत ज्यांच्याकडे भात बियाणे शिल्लक नाही किंवा नव्याने लागवड करणारे शेतकऱ्यांसाठी ११३ क्विंटल कर्जत-९ हे बियाणे मोफत देण्यात येणार आहे. तर कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत ५० क्विंटल रत्नागिरी ६, ८, कर्जत - ९ हे बियाणे देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याचा लाभ अडीच हजार शेतकऱ्यांना होणार असून वाटपाबाबत नियोजन सुरू आहे.

वरई : एकेकाळी नाचणीबरोबर वरई पिकांचेही उत्पादन घेतले जात होते, मध्यंतरी वरईचे लागवडीखालील क्षेत्र घटले. नव्याने प्रोत्साहन देताना फुले एकादशी या वाणाचे दीड क्विंटल बियाणांचे वाटप केले जाणार आहे. यातून ३० हेक्टर क्षेत्रावर वरईचे पीक घेतले जाणार आहे.

तूर : शेताच्या बांधावर तुरीची लागवड चांगल्या प्रकारे होते. या पिकाच्या वाढीसाठी सहा क्विंटल बियाणे दीड हजार शेतकऱ्यांना मोफत दिले जाणार आहे.

नाचणी : रायगड जिल्ह्यात पूर्वी नाचणी पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात असे. या पिकाला पुन्हा प्रोत्साहन देण्यासाठी यंदा २ हजार हेक्टर क्षेत्रातील लागवडीसाठी १०० क्विंटल इतके बियाणे मोफत दिले जाणार आहे. दापोली-१, दापोली-२, दापोली-३ असे बियाणे महाबीज या उत्पादक संस्थेकडून शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे.

१०० टक्के मोफत बियाणे वाटपाची सर्व तयारी झाली आहे. मात्र, आचारसंहितेमुळे वाटप करता येत नाही. यासाठी निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता शिथिल करण्याची विनंती करण्यात आली आहे. पुढील काही दिवसांत शिथिलतेचे आदेश येताच त्‍वरित बियाणे वाटप सुरू केले जाईल.
सतीश बोराडे, प्रभारी कृषी उपसंचालक, रायगड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com