Tur Seed : तुरीच्‍या बियाणेदरांना यंदा ‘फोडणी’

Tur Sowing : गेले काही महिने तुरीला चांगला दर मिळतो आहे. यामुळे या हंगामात तुरीचे लागवड क्षेत्र सर्वच भागांत वाढण्याची चिन्हे आहेत.
Tur Rate
Tur RateAgrowon
Published on
Updated on

Akola News : गेले काही महिने तुरीला चांगला दर मिळतो आहे. यामुळे या हंगामात तुरीचे लागवड क्षेत्र सर्वच भागांत वाढण्याची चिन्हे आहेत. उत्पादक कंपन्यांनी ही संधी मानत यंदा बियाण्याच्या दरांना चांगलीच फोडणी दिली आहे.

एका नामांकित कंपनीचे बियाणे किलोमागे तब्बल ८० रुपयांपेक्षा अधिक वाढवण्यात आले आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. राज्यात सुमारे १० लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर तुरीची लागवड होत असते.

खरीप हंगामात संपूर्ण राज्यातच तुरीची लागवड केली जाते. त्यातही विदर्भ, मराठवाडा भागात सोयाबीन पिकात आंतरपीक म्हणून बहुतांश शेतकरी तुरीची लागवड करीत असतात. खरिपातील इतर पिकांच्या तुलनेत तुरीला सध्या चांगला दर मिळतो आहे. सद्यःस्थितीत तूर सरासरी १० हजार रुपये आहे. किमान ८००० पासून विक्रीला सुरुवात होऊन कमाल साडेबारा हजारांपर्यंत दर टिकून आहेत.

Tur Rate
Tur Rate : यवतमाळमध्ये तुरीला कमाल १२ हजार ३०० रुपये दर

तुरीचे हेच दर पाहून या हंगामात लागवड क्षेत्रात वाढीचे नियोजन प्रत्येक जिल्ह्याने केले आहे. हीच बाब हेरून बियाणे कंपन्यांनी दरवाढीची चलाखी केली आहे. मागील हंगामात २३० ते २८० रुपयांदरम्यान विकल्या गेलेले तुरीचे बियाणे या वेळी होलसेलमध्येच ३६० रुपये करण्यात आले आहे. तर या बियाण्याच्या बॅगवर ४०५ रुपये किंमत कंपनीने टाकलेली आहे.

ही दरवाढ एका नामांकित तूर उत्पादक कंपनीच्या बियाण्याची आहे. इतर कंपन्यांनीही यंदा किलोचा दर २४० रुपयांवर आणून ठेवला आहे. कंपन्यांकडून होलसेल दरच वाढवण्यात आल्याने साहजिकच आता शेतकऱ्यांना यापेक्षा अधिक दराने तुरीच्या बियाण्याची खरेदी करावी लागणार आहे.

याची झळ शेतकऱ्यांच्या खिशाला निश्‍चितच बसेल. कंपन्यांनी क्विंटलमागे सुमारे ८००० रुपयांनी दर वाढवल्याचे दिसून येत आहे. तुरीला बाजारपेठेत मिळणाऱ्या दरांपेक्षा बियाण्याचा दर हा चार पटीने अधिक आहे.

Tur Rate
Tur Cultivation : गादीवाफ्यावरील तूर लागवड ठरली फायदेशीर

तुरीला दर मिळतोय, पण उत्पादनाचे काय?

बाजारात तुरीला दर मिळत असल्याचे सर्वत्र दिसून येते. मात्र यंदा तुरीचे उत्पादन अर्ध्यापेक्षा अधिक प्रमाणात घटले होते. तुरीचे पीक ऐन फुलोरा, शेंगांच्या अवस्थेत असताना ढगाळ वातावरण, धुके तसेच अळी पडल्याने संकटात सापडले होते.

जेव्हा शेतकऱ्यांनी तुरीची काढणी केली तेव्हा एक तर तुरीच्या मालात ‘मुकणी’चे प्रमाण प्रचंड झाले. अर्धाअधिक माल असाच तयार झाला. या ‘मुकणी’युक्त तुरीची विक्री ५ हजारांपासून करावी लागली. चांगल्या दर्जाची तूर फार कमी शेतकऱ्यांना झाली होती. बाजारातील मागणी, तुरीचे घटलेले उत्पादन यामुळे गेले काही महिने तुरीला वाढीव दर मिळत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com