Processing Industry : केळी प्रक्रिया उद्योगांना वीत्तपुरवठ्याबाबत मंथन

IAS Aayush Prasad : केळीच्या खोडापासून धागा, सेंद्रिय खत तसेच कोळसा निर्मिती शक्य आहे. क्षमता असलेल्या प्रत्येक गावात प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी बँकांनी साहाय्य करावे. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.
Banana Processing Industry
Banana Processing IndustryAgrowon

Jalgaon News : कृषी व पूरक व्यवसायात जिल्ह्याच्या आर्थिक परिवर्तनाची ताकद आहे. त्याकडे बँकांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. केळीच्या खोडापासून धागा, सेंद्रिय खत तसेच कोळसा निर्मिती शक्य आहे. क्षमता असलेल्या प्रत्येक गावात प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी बँकांनी साहाय्य करावे. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या. जिल्ह्यातील बँकांच्या क्षेत्रीय व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापकांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रकांत पाटील, जिल्हा व्यवस्थापक अग्रणी बँक प्रणवकुमार झा, नाबार्ड जिल्हा समन्वयक, जिल्हा उद्योग केंद्र व्यवस्थापक, संचालक आत्मा, ‘एमएसएमई’चे नोडल अधिकारी, उपस्थित होते. श्री. प्रसाद म्हणाले, की जामनेरला सुमारे ४ हजार शेततळे मंजूर आहेत.

Banana Processing Industry
Food Processing Industry : कथा : अन्नप्रक्रिया उद्योग वाढीची

त्यापैकी बाराशे शेततळे या वर्षी तयार होतील. तेथे मत्स्य व्यवसायाला संधी निर्माण होईल, त्यासाठी विविध सहकारी संस्थांना लक्ष्य करून रोजगार निर्मितीसाठी बँकांनी पुढाकार घ्यावा. ओमेगा थ्री फॅटी ॲसिड उद्योग देखील तेथे उभारता येईल. विशिष्ट बचत गट किंवा शेतकरी ऑर्गनायझेशन यांच्या साह्याने ओमेगा थ्री फॅटी ॲसिड उद्योगाची चाचपणी करण्यात येईल. मत्स्यपालनाबरोबर पशुपालन व्यवसायाचे देखील लक्ष्य पूर्ण करण्याचे सांगितले.

Banana Processing Industry
Food Processing Industries Scheme : सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाला मंजुरी

रेशीम उत्पादनासाठी जामनेर तालुका योग्य असून, तेथून छत्रपती संभाजीनगर मार्गे जालना मार्केटला पोहोचणे सोपे असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पाटील यांनी सांगितले. पुढील आर्थिक वर्षासाठी बँकांचा क्षेत्रनिहाय, योजनानिहाय पत आराखड्याचे सादरीकरण झाले. कृषीसाठी केसीसी करण्यात शंभर टक्के लक्ष्य साध्य करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

बैठकीत सूचना...

बचत गटांना फूल शेतीसाठी आर्थिक साह्य

दूध शीतकरण केंद्रांना दूध प्रक्रिया उद्योगाला जोडण्यासाठी आर्थिक साह्य

मजुरांच्या समूहाला यांत्रिकी साहित्य खरेदीसाठी मदत

मजुरांचे समूह शेती कामाला सेवा पुरवतील

शेतीचे कामे जलद होतील आणि त्यांना त्यातून रोजगार मिळेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com