Crop Insurance : छत्रपती संभाजीनगरमध्ये काहींनी क्षेत्र नसताना, तर काहींनी क्षेत्रापेक्षा जास्त काढला पीक विमा

Agriculture Department : पंतप्रधान पीक विमा योजना व पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेत काहींनी क्षेत्र नसताना तर काहींनी क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्राचा पीक विमा काढल्याची बाब कृषी विभागाच्या पाहणीत पुढे आली आहे.
Crop Insurance Scheme
Crop Insurance SchemeAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान पीक विमा योजना व पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेत काहींनी क्षेत्र नसताना तर काहींनी क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्राचा पीक विमा काढल्याची बाब कृषी विभागाच्या पाहणीत पुढे आली आहे.

फळ पिकासाठी पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना राबवली जाते तर पंतप्रधान पीक विमा योजनेतून इतर पिकांना पीक विम्याचे संरक्षण दिले जाते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मृग बहर २०२४ अंतर्गत फळ पिकाच्या सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत अधिकच्या क्षेत्राचा विमा उतरविला गेल्याच निदर्शनास आले.

Crop Insurance Scheme
Crop Insurance : पाच पिकांच्या पेरणी क्षेत्रापेक्षा विमा संरक्षित क्षेत्र अधिक

त्यानंतर हरकतीत आलेल्या कृषी विभागाकडून सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये जिल्ह्यातील विमा संरक्षित पीक क्षेत्राची तपासणी करण्यात आली. त्या तपासणीमध्ये जिल्ह्यातील १३ हजार २८६ जणांच्या पीक विमा संरक्षित ८९१०.८६ हेक्टर क्षेत्रापैकी ११ हजार ७८८ जणांचे ७६७६.४४ हेक्टर क्षेत्र पात्र आढळले. तर १४९८ जणांचे फळ पिकाचे क्षेत्रच नसताना ८०५.४८ हेक्टर क्षेत्रावर फळ पीक विमा उतरविल्याचे व २५२५ जणांच्या आहे त्या क्षेत्रापेक्षा ४२८.९४ हेक्टर क्षेत्राचा जास्तीचा पीक विमा उतरविल्याची बाब समोर आली.

दुसरीकडे खरीप हंगाम २०२४ मधील कांदा पिकाचा पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गतही असाच प्रकार समोर आला. त्यामध्ये जिल्ह्यातील ३१ हजार १७७ जणांच्या ११ हजार ७७०.२१ हेक्टर विमा संरक्षित क्षेत्रापैकी २२ हजार ६६१ शेतकऱ्यांचे ७४३२.८० हेक्टर क्षेत्र पीक विमा योजनेच्या संरक्षणानुसार पात्र असल्याचे समोर आले.

तर ८५१६ जणांच्या त्यांच्याकडे कांद्याचे क्षेत्र नसताना ३१५२.१८ हेक्टरवरील कांदा पीक विमा उतरविल्याचे व ८८४४ जणांनी त्यांच्याकडे असलेल्या क्षेत्राच्या तुलनेत ११८५.२३ हेक्टर क्षेत्राचा जास्तीचा कांदा पिकाचा विमा उतरविल्याचेही समोर आले. अनेक भागात असे प्रकार आढळून आल्याने या प्रकरणात कृषी विभागाकडून शासनाकडे काय कारवाई करावी या अनुषंगाने मार्गदर्शन मागण्यात आल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com