Republic Day Protest : शेतकरी नेते २६ जानेवारी रोजी पंजाबमधील भाजप नेत्यांच्या घराला घेराव घालणार

Farmer Protests : सर्वणसिंग पंढेर म्हणाले, "शेतकऱ्यांची मोठा मोर्चा काढण्यात येणार असून कॉर्पोरेट आणि भाजप नेत्यांच्या घराला घेराव घालण्यात येणार आहे, असं पंढेर यांनी सांगितलं. पंढेर बुधवारी (ता.२२) संध्याकाळी पत्रकार परिषदेत बोलत होते.
farmer leader sarvansingh pandher
farmer leader sarvansingh pandherAgrowon
Published on
Updated on

Farmerprotest 26 January : हरियाणा पंजाबच्या सीमेवर हमीभाव गॅरंटी कायद्यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकरी नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. २६ जानेवारी रोजी पंजाबमधील शॉपिंग मॉल आणि भाजप नेत्यांच्या घराला घेराव घालण्याची घोषणा केली आहे. यासंदर्भात बोलताना शेतकरी नेते सर्वणसिंग पंढेर म्हणाले, "शेतकऱ्यांची मोठा मोर्चा काढण्यात येणार असून कॉर्पोरेट आणि भाजप नेत्यांच्या घराला घेराव घालण्यात येणार आहे, असं पंढेर यांनी सांगितलं. पंढेर बुधवारी (ता.२२) संध्याकाळी पत्रकार परिषदेत बोलत होते.

शेतकरी नेते जगजितसिंग डल्लेवाल यांच्या उपोषणासमोर केंद्र सरकारने गुडघे टेकले असून चर्चेसाठी तयारी दाखवली आहे. त्यानंतर डल्लेवाल यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास होकार दिला. यावेळी त्यांच्यावर डॉक्टरांनी उपचारही सुरू केले. अद्यापही डल्लेवाल यांचे उपोषण सुरूच आहे. डल्लेवाल यांच्या उपोषणाचा आज ५८ व्या दिवस आहे. परंतु खनौरी सीमेवर डल्लेवाल यांना वैद्यकीय उपचार करण्यास सरकारी डॉक्टरांनी नकार दिल्याने चर्चेला उधाण आलं आहे.

farmer leader sarvansingh pandher
Dallewal Vs Amit Shah : 'आम्ही शेतकऱ्यांचा माल साडेतीन पट अधिक भावाने खरेदी केला', अमित शाह यांचा दावा; डल्लेवाल यांचा थेट इशारा

प्रकरण काय?

डल्लेवाल यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर्सने एक पत्र लिहून वैद्यकीय उपचार देण्यास नकार दिला. यामध्ये एक कनिष्ठ आणि वरिष्ठ डॉक्टरांचा समावेश आहे. डल्लेवाल यांच्यावर उपचार करताना आंदोलक शेतकऱ्यांनी छळ केल्याचा आरोप डॉक्टरांनी केला आहे. तसेच माध्यमातील पत्रकार आणि डल्लेवाल यांच्या समर्थकांनी शिवीगाळ केल्याचंही पत्रात लिहिलं आहे. यावर सर्वणसिंग पंढेर यांनी डॉक्टरांच्या छळाबद्दल काहीच माहिती नसल्याचं सांगितलं.

दरम्यान, १८ जानेवारी रोजी कृषी मंत्रालयाचे संयुक्त सचिव प्रिय रंजन यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चस्तरीय केंद्रीय मंडळाने खनौरी सीमेवर जाऊन डल्लेवाल यांच्याशी चर्चा केली. शेतकरी नेत्यांशी १४ फेब्रुवारीपासून चंडीगढ येथे पुन्हा एकदा चर्चासत्र सुरू करण्यासाठी निमंत्रण दिलं. त्यावरून डल्लेवाल यांनी प्रस्ताव स्वीकारत वैद्यकीय उपचारास सहमती दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com