
Pune News : मोदी सरकारने गेल्या १० वर्षात शेतीमालाची खरेदी २. ५ पटीने वाढवली तर हमीभावात ३.५ पटीने वाढ केल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला होता. त्यांचा हा दावा शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल खोडून काढला आहे. तसेच त्यांनी शाह यांना इशारा, देताना हमीभावावरून चुकीची माहिती पसरवू नका, असा सल्ला डल्लेवाल यांनी दिला आहे.
अमित शाह यांनी दोन दिवसांपूर्वी एका खासगी वृत्तवाहिणीला मुलाखतीत दिली होती. त्यावेळी त्यांना शंभू सीमेवरील आंदोलक शेतकऱ्यांना दिल्लीत का येऊ दिलं जात नाही, असा सवाल केला होता. यावरून अमित शाह यांनी, मोदी सरकाराच्या काळात हमीभावाने खरेदी २.५ पटाने वाढली. तसेच हमीभावात साडेतीन पट वाढ केल्याचा दावा केला होता.
तसेच गेल्या १० वर्षांच्या काळात शेतीमालाची खरेदी २. ५ पटीने वाढवली. हमीभावातही ३.५ पटीने वाढ केली. आमच्या या कामामुळे देशातील सर्व शेतकरी समाधानी आहेत. देशातील जनताही ते कबूल करते. पण काही शेतकरी नवा मुद्दा घेऊन आंदोलन करत आहेत. यावर सर्वोच्च न्यायालयाने देखील चर्चा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे आम्ही दोन दिवसात जाऊ, चर्चा करू. पण ही चर्चा अधिकारी करतील असे त्यांनी स्पष्टीकरण दिले होते.
शाह यांनी केलेल्या वक्तव्यावरून आता शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल निशाना साधला आहे. शाह यांनी हमीभावावर केलेल्या विधानाचे खंडन त्यांनी केले आहे. अमित शाह असा दावा करत असतील तर सरकारला हमीभावाचा कायदा करायला काय हरकत आहे? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
केंद्र सरकार साडेतीन पट अधिक हमीभावाने शेतमालाची खरेदी करण्याचा दावा करत असेल तर हमीभाव कायद्याची अंमलबजावणी करायला काय हरकत आहे? उत्तर प्रदेश आणि बिहारसह अनेक राज्यांमध्ये हमीभावावर धानाची खरेदी होत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत, असल्याचा दावा देखील डल्लेवाल यांनी केला आहे. डल्लेवाल यांनी, शाह यांना लोकांना चुकीची माहिती देऊ नका, असा सल्ला दिला असून शेतकऱ्यांना मोर्चाच्या ठिकाणी सतर्क राहण्यास सांगितले आहे. तसेच त्यांचे उपोषण संपवण्यासाठी सरकार त्यांना तेथून हटवू शकते, असाही दावा त्यांनी केला आहे.
शाह यांच्या दाव्यानंतर शेतकरी नेते अभिमन्यू कोहर यांनी शाह यांनी चर्चेस यावे, असे आव्हान दिले आहे. तर त्यांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे. मोदी मुख्यमंत्री असताना हमीभाव कायदा लागू करण्याची सतत मागणी करत होते. पण आता ते स्वत: पंतप्रधान असून केंद्रासह अनेक राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चुकीची माहिती पसरवण्यापेक्षा केंद्राने हमीभावाचा कायदा करावा. ते चर्चेस तयार असतील तर एसकेएम (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चा डेटासह चर्चा करायला तयार आहे. मग देशातील जनताच सांगेल की कोण बरोबर आहे आणि कोण चूक.
दरम्यान शेतकरी नेते सर्वनसिंह पंढेर आणि राकेश टिकैत यांनी पंजाबमध्ये उद्या (बुधवारी) ट्रॅक्टर मोर्चा आणि रेल्वे रोकोची घोषणा केली आहे. त्यांनी पंजाबमधील जनता आणि शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चासह रेल्वे रोको मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. उद्या रेल्वे रोकोची दुपारी १२ ते ३ या वेळेत होणार आहे. पंढेर यांनी, आमचा विरोध राज्य सरकारच्या विरोधात नसून तो केंद्राच्या धोरणांविरोधात आहे. शेतकरी नेते डल्लेवाल यांची प्रकृती गंभीर असून त्यांना काही झाल्यास त्याला केंद्र सरकार जबाबदार असेल, असाही इशारा पंढेर यांनी दिला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.