Politics Update : ‘जय जवान, जय किसान’ घोषणेचा भाजपला सोयीने विसर पडलाय

Dr. Amol Kolhe : दहा वर्षांत केंद्र सरकारकडून अपेक्षाभंग झाला आहे, त्यामुळे मतदानाला जाताना साऱ्या गोष्टीचा विचार करून मते द्या असे खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले.
Dr. Amol Kolhe
Dr. Amol KolheAgrowon

Nagar News : ‘जय जवान, जय किसान’ घोषणेचा भाजपला सोयीने विसर पडलाय. कारण हक्क मागणाऱ्या शेतकऱ्यांना दिल्लीच्या वेशीवर अडवून वेठीस धरणारे कोणत्या तोंडाने हा नारा देतील. दहा वर्षांत केंद्र सरकारकडून अपेक्षाभंग झाला आहे, त्यामुळे मतदानाला जाताना साऱ्या गोष्टीचा विचार करून मते द्या असे खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले.

नगर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारासाठी खासदार अमोल कोल्हे यांची रविवारी (ता. ५) रात्री सभा झाली. माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, नीलेश लंके यांच्यासह महाविकास आघाडीतील नेते उपस्थित होते. डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, ‘‘माझ्या मतदार संघात अजून मतदान व्हायचे आहे.

Dr. Amol Kolhe
Indian Politics : भाजपच्या पराभवासाठी दिंडोरीतून ‘माकप’ची माघार

तरीही आम्ही बाहेर पडलो आहोत. यावेळीच्या निवडणुकीत स्वार्थासाठी सरपटणाऱ्यांच्या मागे न जाता लढणाऱ्यांसोबत लोक आहेत. तोच पर्याय लोक निवडणार आहेत हे दिसतेय. पाच-पाच पिढ्याची पुण्याई, यंत्रणा, राज्यात, केंद्रात सत्ता आणि तोंडात सोन्याचा चमचा घेतल्यांना जनमताला आवाज कधी कळला नाही.

Dr. Amol Kolhe
Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

त्यांना लोक धडा शिकवतील. देशातल्या मनातील खदखद लोकांनी सहभागी होत मोकळी केली. देशातील सर्वसमान्य लोकांनी निवडणूक हाती घेतली आहे. दोन उमेदवार, दोन पक्ष यांच्यातील ही निवडणूक नसून देशात दहा वर्षे अपेक्षाभंग करणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात लोकांनी ही निवडणूक हाती घेतली आहे. दहा वर्षांत महागाई वाढली आहे. सध्या काही प्रमाणात महागाई कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र पुन्हा हे लोक निवडून आले तर दुप्पट महागाई करतील, असेही ते म्हणाले.

अनिल राठोड यांची आठवण

नगर शहरातील माजी आमदार स्व. अनिल राठोड यांची या सभेत प्रत्येकांनी आठवण केली. नगर शहर मतदार संघात पंचवीस वर्ष प्रतिनिधित्व करणारे अनिल राठोड सामान्य जनतेसाठी लढणारे होते. ते नसल्याचे दुखः व्यक्त करत मागील निवडणुकीत त्यांनी मदत केली. मात्र विधानसभेला त्यांनी ज्यांना मदत केली त्यांनीच विरोधी काम करून त्यांना पराभूत केल्याचा आरोप यावेळी अनेकांनी भाषणात केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com