Vidhansabha Election Result Live : कापूस आणि सोयाबीनच्या भावावरून शेतकऱ्यांची नाराजी सत्ताधारी भाजप आणि महायुतीला भोवेल, असा कयास लावला जात होता. पण मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये मराठवाड्यातील ४६ जागांपैकी महायुती २७ जागांवर तर महाविकास आघाडी ७ जागांवर पुढे आणि विदर्भातील ६२ जागांपैकी महायुती १७ तर महाविकास आघाडी ८ जागांवर आघाडी आहे. आर्थात हे सुरुवातीचे कल आहेत. जसजशी मतमोजणी पुढे जाईल तसे यात बदलही दिसू शकतो.
महायुतीला महाविकास आघाडीला धोबीपछाड देताना दिसत आहे. मराठवाडा आणि विदर्भात भाजप आणि महायुती आघाडीवर दिसून येत आहे. निवडणुकीत कापूस आणि सोयाबीनचा भावाचा मुद्दा चांगलाच तापला होता. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोयाबीनच्या भावाविषयी आश्वासन द्यावे लागले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही शेतीमालाच्या भावाविषयी आश्वासने द्यावी लागली होती.
मराठवाडा आणि विदर्भात सोयाबीन हे मुख्य पीक बनले आहे. यंदा सोयाबीनचा पेरा वाढला. मात्र पावसाने पिकाचे मोठे नुकसान झाले. यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट आली. पिकाची गुणवत्ताही कमी झाली. त्यामुळे सोयाबीनला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र उत्पादन कमी राहूनही सोयाबीनला गेल्या १० वर्षातील निचांकी भाव मिळत होता.
ऐन निवडणुकीत सोयाबीन आणि कापसाचे भाव पडले. याचा संताप शेतकऱ्यांमध्ये होता. मतदानातून हा संताप पुढे येईल, असा अंदाज लावला होता. शेतकरी तसे बोलूनही दाखवत होते. कापूस आणि सोयाबीनचे भाव पाडणाऱ्याला आम्ही पाडू, असे शेतकरी उघडपणे बोलून दाखवत होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. कारण मराठवाडा आणि विदर्भात एकूण १०८ जागा आहेत. याचा धास्ती सत्ताधाऱ्यांनी घेतली होती.
मात्र निवडणूक निकालाच्या सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप आणि महायुतीलाच शेतकऱ्यांनी पसंती दिल्याचे दिसून येत आहे. कारण सुरुवातीला कलांमध्ये मराठवाड्यातील ४६ जागांपैकी महायुतीला २७ आणि महाविकास आघाडीला ७ मिळाली तर विदर्भातील ६२ जागांमध्ये महायुतीला १७ आणि महाविकास आघाडीला जागांवर ८ आघाडी दिसून येत आहे. आर्थात हे सुरुवातीचे कल आहेत. जसजशी मतमोजणी पुढे जाईल तसे यात बदलही दिसू शकतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.