Vande Bharat Railway : जालना ते मुंबई वंदे भारत रेल्वे सुरू

Railway Update : मनमाड ते जालना रेल्वे विद्युतीकरण पूर्ण झाले. त्यामुळे जालना रेल्वे स्थानकावरून शनिवारी (ता. ३०) जालना ते मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वे सुरू करण्यात आली.
Manmad to Jalna
Manmad to JalnaAgrowon
Published on
Updated on

Jalna News : मनमाड ते जालना रेल्वे विद्युतीकरण पूर्ण झाले. त्यामुळे जालना रेल्वे स्थानकावरून शनिवारी (ता. ३०) जालना ते मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वे सुरू करण्यात आली. या रेल्वेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हिरवा झेंडी दाखवली.

संपूर्ण देशात आज घडीला ३४ वंदे भारत रेल्वे सुरू आहेत. यामध्ये शनिवारी (ता. ३०) आठ वंदे भारत रेल्वेंची भर पडली. या आठ वंदे भारत रेल्वेमध्ये जालना ते मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वे ही जालना रेल्वे स्थानक येथून सुरू करण्यात आली आहे.

Manmad to Jalna
Shakuntala Railway : शकुंतला रेल्वे धावणार ब्रॉडगेज रुळावरून

जालना रेल्वे स्थानक येथे आयोजित या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री अतुल सावे, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार नारायण कुचे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार संतोष दानवे, आमदार कैलास गोरंट्याल, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर आदींची उपस्थिती होती.

Manmad to Jalna
The Saints : राष्ट्रसंतांची शिकवण देशाला प्रगतीकडे नेणारी : वाघ

जालना रेल्वे स्थानकावरून सुरू झालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसचा मराठवाड्यातील प्रवाशांना मुंबई येथे जाण्यासाठी फायदा होणार आहे. यात प्रामुख्याने जालना, छत्रपती संभाजीनगर या दोन शहरांतील प्रवाशांसाठी ही रेल्वे महत्त्वाची ठरणार आहे. याशिवाय परभणी, नांदेड या शहरांतील प्रवाशांनाही जालना येथून या रेल्वेने प्रवास करता येणार आहे.

ही वंदे भारत एक्स्प्रेस छत्रपती संभाजीनगर, मनमाड, नाशिक रोड, कल्याण, ठाणे, दादर या रेल्वे स्थानकांवर थांबे घेऊन मुंबई येथील छत्रपती शिवाजी टर्मिनल रेल्वे स्थानकापर्यंत जाणार आहे. ही रेल्वे नियमित धावणार असून, जालना येथून पहाटे ५.०५ मिनिटांनी सुटणार असून, ती मुंबई येथे बारा वाजेपर्यंत पोहोचणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com