
Solapur News : उजनी जलाशयाचे खास आकर्षण असलेले फ्लेमिंगो अर्थात रोहित पक्षी दरवर्षी हिवाळ्यात स्थलांतर करून धरण काठावर येतात. हे पक्षी नुकतेच जलाशयावर येऊन दाखल झाल्याची नोंद पक्षी अभ्यासकांनी केली आहे.
दरम्यान, सुमारे पन्नासहून अधिक संख्येने आलेले फ्लेमिंगो पक्षी धरण परिसरातील इंदापूर तालुक्यातील पळसदेव, शिंदेवस्ती, काळेवाडी, कुंभारगाव आदी शिवारातील फुगवठ्यावर दाखल झाल्याची माहिती स्थानिक पक्षीमित्रांनी दिली.
फ्लेमिंगोंचे वैशिष्ट्ये
सुमारे पाच ते साडेपाच फूट उंचीचे पांढरेशुभ्र परंतु गुलाबी छटा असलेले पंख, आखूड व वक्राकार केशरी चोच, गुलाबी रंगाचे लांब पाय तसेच बाकदार मान हे फ्लेमिंगोची वैशिष्ट्ये आहेत. या पक्ष्यांचा पंखाखालील भाग रक्तवर्णीय असतो व ते आकाशात झेप घेतल्यानंतर गडद लाल रंगाचे पंख ज्वाळाप्रमाणे दिसतात.
या कारणामुळे हा पक्षी अग्निपंख या नावानेही ओळखला जातो. ज्यावेळी हे पक्षी उथळ पाण्यात उभारलेले असतात तेव्हा ते गुलाबी रंगमिश्रित धवलवर्णीय दिसतात व या कारणामुळे रोहित पक्षी या नावाने हे पक्षी ओळखले जातात.
यंदा एक महिना अगोदर आगमन
स्थलांतरित पक्ष्यांचा चराऊ भाग पाण्याखाली गेल्यामुळे पक्षी आपल्या प्रवासाचे वेळापत्रक बदलून आगमन लांबणीवर टाकतील, असे वाटत असताना पक्ष्यांनी यंदा लवकर स्थलांतर केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.