Marathwada Farmers Death : मराठवाड्यातील ५०१ पैकी २९७ शेतकरी आत्महत्यांची प्रकरण मदतीसाठी पात्र

Farmer Death Compensation : मराठवाड्यातील जानेवारी ते २७ जून २०२५ दरम्यान शेतकरी आत्महत्यांच्या एकूण ५०१ प्रकरणांपैकी २९७ प्रकरण शासनाच्या मदतीसाठी पात्र ठरली आहे.
Agriculture Issue
Farmers Issue Agrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील जानेवारी ते २७ जून २०२५ दरम्यान शेतकरी आत्महत्यांच्या एकूण ५०१ प्रकरणांपैकी २९७ प्रकरण शासनाच्या मदतीसाठी पात्र ठरली आहे. शिवाय ६० प्रकरण अपात्र ठरली असून १४४ प्रकरण चौकशीसाठी प्रलंबित असल्याची माहिती महसूल प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

या प्रकरणात अधिक माहितीनुसार, की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जानेवारी ते २७ जून दरम्यान ८७ शेतकरी आत्महत्यांची प्रकरण पुढे आली. त्यापैकी ६० प्रकरण मदतीसाठी पात्र ठरली तर ११ अपात्र ठरले. १६ प्रकरणात चौकशी प्रलंबित आहे. जालना जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे २८ प्रकरणे घडली.

Agriculture Issue
Amaravati Farmers Death : चार महिन्यांत ६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

त्यापैकी १८ प्रकरण पात्र ठरली तर दहा प्रकरणात चौकशी निर्णयाकरिता प्रलंबित आहे. परभणी जिल्ह्यात ६१ शेतकरी आत्महत्यांची प्रकरण पुढे आली. त्यापैकी २९ पात्र तर १८ अपात्र ठरले. १४ प्रकरणात चौकशी प्रलंबित आहे. हिंगोली जिल्ह्यातील ३१ शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणापैकी १३ मदतीसाठी पात्र तर पाच अपात्र ठरले.

१३ प्रकरणांत चौकशी प्रलंबित आहे. नांदेड जिल्ह्यातील ७२ शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणापैकी ३७ शासनाच्या मदतीसाठी पात्र ठरली, तर दोन अपात्र ठरले. ३३ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. बीड जिल्ह्यात सर्वाधिक १२४ शेतकऱ्यांच्या आत्महत्यापैकी ९३ प्रकरणे मदतीसाठी पात्र, तर १९ प्रकरण अपात्र ठरले.

Agriculture Issue
Farmers Death : दोन महिन्यांत अमरावती जिल्ह्यात ४२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

१२ प्रकरणात अद्याप चौकशी प्रलंबित आहे. लातूर जिल्ह्यातील ३६ शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणांपैकी २६ आत्महत्यांची प्रकरण पात्र ठरली दहा प्रकरणात चौकशी प्रलंबित आहेत. धाराशिव जिल्ह्यातील ६२ शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणांपैकी २१ प्रकरणात पात्र, तर ५ अपात्र ठरली. ३६ शेतकरी आत्महत्यांची प्रकरण चौकशीसाठी प्रलंबित असल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

...असे झाले वितरण

जानेवारी ते २६ जून दरम्यान झालेल्या शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणांमध्ये जानेवारीत ६५ लाख, फेब्रुवारीत ५६, मार्चमध्ये ७१, एप्रिलमध्ये ३६, मेमधील १७ तर २६ जून पर्यंत झालेल्या २ लाख रुपयांची मदत मिळून शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणात आतापर्यंत २ कोटी ४७ लाख रुपयांची मदत देण्यात आली असल्याची ही महसूल प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com