
Amaravati News : एप्रिल व मे मध्ये अवकाळी पावसाने अमरावती जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रातील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतनिधीत कपात करण्यात आली आहे. ही मदत आता २७ मार्च २०२३ च्या शासननिर्णयाप्रमाणे देण्यात येणार असून ती दोन हेक्टरच्या मर्यादेत आहे. प्रशासनाला त्यानुसार मदतनिधीच्या मागणीचे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
एप्रिलमधील नुकसानीच्या निधीचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून २.८३ कोटी रुपयांची मागणी नोंदविण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्यातील १४ हजार ४३३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले.
या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश असून एप्रिलमधील पंचनामे आटोपले असून मे मधील नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी सांगितले.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २७ मार्च २००३ च्या शासननिर्णयानुसार मदत दिली जाणार आहे. ही मदत दोन हेक्टरच्या मर्यादेत असून त्यामध्ये जिरायती पिकांसाठी ८ हजार ५००, बागायतीसाठी १७ हजार व बहुवार्षिक पिकांसाठी २२ हजार ५०० रपपये मदतीचे निकष आहेत.
मे मध्ये सर्वाधिक नुकसान
मे मध्ये ३२५ गावांमधील १३ हजार ६३९ हेक्टर क्षेत्रातील मूग, तीळ, केळी, संत्रा, पपई, कांदा, ज्वारी, लिंबू पिकांचे नुकसान झाले आहे. तीन जणांचा वीज पडल्याने मृत्यू झाला तर ७४१ घरांची पडझड झाली. त्यापैकी १४ घरांची पूर्णत: पडझड झाली आहे. १२ गोठे आणि झोपडीचे नुकसान झाले आहे. २९ लहान जनावरे आणि १२ मोठे पशुधन मृत झाले. मृत व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान, तर मृत जनावरांच्या मालकांना पशुधन साह्य अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
एप्रिलमधील नुकसान
एप्रिलमध्ये अवकाळी पाऊस आणि वादळामुळे जिल्ह्यातील १ हजार १७४ बाधित गावामधील ७९४ हेक्टर क्षेत्रातील केळी, संत्रा, पपई, कांदा आणि गहू शेतीचे नुकसान झाले. यात अंदाजे २ कोटी ८३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तर अंशतः १८ आणि १ घराचे पूर्ण नुकसान झाले आहे. या मदतनिधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.