Water Scarcity : लोक सहभागातूनच पाणीटंचाईवर मात शक्य

Water Crisis Management : पाण्याची शाश्वत उपलब्धता हाच या समस्यांवर प्रभावी उपाय ठरू शकतो. स्थानिक स्तरावर असलेल्या जलस्रोतांचा अभ्यास करून त्यांचे संरक्षण आणि पुनरुज्जीवन हेच ते शाश्वत उपाय आहेत. यासाठी लोकसहभाग हा महत्वाचा घटक आहे.
Water Crisis
Water Crisis Agrowon
Published on
Updated on

Water Conservation : महाराष्ट्रात अनेक डोंगररांगा आहेत. संपूर्ण पश्चिम घाट हा डोंगररांगांचा प्रदेश आहे, महादेव डोंगर रांगा सातमाळा- अजिंठा डोंगररांगा, हरिश्चंद्र-बालाघाट डोंगररांगा,गाविलगड टेकड्या गायगुडी, सातपुडा पर्वतरांग, शूलपाणी, अस्तंभा, अक्राणी डोंगररांगा, शिरोळ टेकड्या आंबगड टेकड्या, मेळघाट, सुरजागड भामरागड, चांदूरगड डोंगर, शंभू महादेव एक नव्हे अनेक डोंगररांगा आहेत. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यामध्ये देखील काही काही छोट्या डोंगराच्या भूप्रदेशाचा आहे.

याच डोंगराळ प्रदेशातून अनेक छोट्या आणि मोठ्या नद्यांचे उगम आहेत. कृष्णा, गोदावरी, पंचगंगा, वैतरणा यांच्या उगमदेखील डोंगररांगांतून होतो. मांजरा मन्याड या नद्या बालाघाट पर्वतातून उगम पावतात. सूर्यकन्या, तापी आणि नर्मदा नदीला मिळणाऱ्या छोट्या नद्या देखील याच डोंगर रांगांतून उगम पावतात. या डोंगररांगांची उंची १६४६ मीटर (कळसूबाई) ते ८४८ मीटर (अक्राणी) अशी आहे.

याशिवाय जिल्हानिहाय असलेल्या डोंगररांगांनी उंची सुमारे ३०० ते ४०० मीटरच्या परिघात येते. सातपुडा  ही  भारताच्या  मध्यभागी असलेली आणि तिच्या उत्तरेला असलेल्या  विंध्य  पर्वतरांगांना समांतर अशी पर्वतरांग आहे. या सातपुड्याच्या उत्तरेला  नर्मदा  आणि दक्षिणेला  तापी  या नद्यांची खोरी आहेत. या पर्वतरांगेला सात घड्या आहेत, म्हणून हिचे नाव सातपुडा पडले. उत्तरेकडून येताना सातपुडा ओलांडला, की महाराष्ट्रात प्रवेश झाला असे समजले जाते.

Water Crisis
Water Crisis Management : जलसंकट निवारणासाठी सर्वांची एकजूट महत्त्वाची

पर्जन्यमान आणि पाण्याची टंचाई

जिल्हा निहाय पर्जन्यमान पाहता राज्यातील सर्वाधिक सरासरी वार्षिक पर्जन्यमान हे रत्नागिरी जिल्ह्यातील ३४१२ मि.मी असून सर्वागत कमी पर्जन्यमान (५९५ मिमि वार्षिक) हे धुळे जिल्ह्यातील आहे. हे संबंधित जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान असले तरीही डोंगररांगांमध्ये पडणारा पाऊस हा पठारी प्रदेशापेक्षा अधिक असतो. महाराष्ट्राचा सुमारे ८२ टक्के भूभाग हा कठीण बेसॉल्ट दगडांनी बनलेला आहे. त्यामुळे भूगर्भात पाणी मुरण्याचे प्रमाण खूपच कमी म्हणजे नगण्यच असते.

पर्जन्यमानाचे उदाहरण

आपण या ठिकाणी रत्नागिरी आणि नंदुरबार जिल्ह्यांचे उदाहरण पाहूयात. रत्नागिरी जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान हे ३४१२ मिमि इतके असले तरीही त्यात कमीत कमी २३०० मिमी हे सागरी भागाचे असून पश्चिम घाटमाथ्यावर हेच प्रमाण ४१०० मिमी एवढे असते. ही तफावत खूप मोठी आहे. पावसाळ्यात वेगाने पाणी वाहत येऊन समुद्रास मिळते; तथापि दिवाळी संपली, की पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची तीव्र स्वरूपाची टंचाई आढळते.

सातपुडा/ शूलपाणी डोंगररांगांतून देखील हीच स्थिती आहे. येथील सरासरी पर्जन्यमान हे ८०१ मिमी असले तरीही मागील दहा वर्षाचे सरासरी पर्जन्य पाहता शहादा येथे ६४५ मिमी पाऊस पडतो, तर नवापूर येथे ११०२ मिमी पाऊस पडतो. तथापि, अक्राणी अथवा धडगाव आणि अक्कलकुवा येथे दरवर्षी अगदी डिसेंबर ते जानेवारीपासून पाणीटंचाईची तीव्रता अधिक असते.

Water Crisis
Water Crisis : वळसंगकर अजूनही तहानलेलेच ; पाणीपुरवठा योजनेच्या अडथळ्यांमुळे समस्या कायम

पालघर , नंदुरबार जिल्ह्यांतील यशकथा

पालघर आणि नंदुरबार हे समान पार्श्वभूमी असलेले जिल्हे आहेत. पर्जन्यमान आणि भूरचना यात बदल आहे, तथापि दोनही ठिकाणी दुर्गमता आणि स्थलांतर समानच आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या धडगाव/अक्राणी तालुक्यातील शूलपाणी डोंगर रांगांमध्ये तसेच इतर डोंगररांगांमध्ये असलेल्या विरळ वस्तीमध्ये पाण्याची टंचाई तीव्र असते.आणि याचा कालावधी सुमारे चार ते सहा महिने इतका असतो. 

तालुक्यात एकूण ८४ ग्रामपंचायती असून सुमारे ६०३ पाडे आहेत. यांपैकी सुमारे २० ते ३० टक्के पाड्यातून विविध समस्या जाणवतात.येथेही पाण्याची तीव्र समस्या आहे. ‘ चला जाणू या नदीला’ अभियानांतर्गत नर्मदा आणि तापी या नद्यांचा अभ्यास करत असताना या बाबी सामोर आल्या. येथील गावातून हंगामी स्थलांतर हे गुजरात राज्यात होते. तसेच मागील काही वर्षापासून पंढरपूर, सोलापूर येथील साखर कारखान्यांच्या क्षेत्रात होत असल्याचे लक्षात येते.

छोटे उपचार प्रभावी आणि शाश्वत

डॉ. अजित गोखले यांनी पालघर जिल्ह्यातील मोखाडा,जव्हार,विक्रमगड येथे केलेल्या कामाचे दीर्घकालीन शाश्वत परिणाम झालेले आहेत. स्थानिक परिस्थितीचा आणि गरजांचा अभ्यास करून लोक ज्ञान आणि विज्ञान यांचा समन्वय करून स्थानिक स्तरावर असलेल्या ओढ्यावर आणि झऱ्यांवर उपचार केले होते त्यामुळे त्यांना होत असलेल्या पाणी टंचाईची तीव्रता कमी होण्यास मदत झाली आहे.

या अनुभवावर आधारित नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील गौऱ्या ग्रामपंचायतीमधील बोधला पाडा येथे एका प्रवाहावर १२ निरनिराळ्या पद्धतीचे बांध बांधले. त्याचा परिणाम त्या पाड्याला असलेल्या मागील १९ वर्षांपासून येणारा पाण्याचा टॅंकर बंद झाला. नंदुरबारच्या जिल्हा प्रशासनाने विशेषत: जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी याची दाखल घेऊन आणखी दोन ठिकाणी काम करण्यास सांगितले. त्यानुसार त्या कामासाठी उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

९७६४००६६८३ (माजी कार्यकारी संचालक, जलसाक्षरता केंद्र, यशदा, पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com