
Solapur News : वळसंग (ता. दक्षिण) सोलापूर येथील नागरिकांची तहान भागवण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. तरीही अनंत अडचणींमुळे वळसंगकरांची तहान काही भागेना. कुरनूर धरणाचे पाणी सदोष वितरिकेमुळे फिल्टर प्लांटपर्यंत पोचतच नसल्याने ही समस्या आणखी बिकट होत आहे.
येथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे नऊ कोटींची पाणीपुरवठा योजना कुरनुर धरणातून राबविण्यात आली आहे. पण गेल्या नऊ महिन्यांपासून या योजनेबाबत नुसतेच कागदी घोडे नाचविण्यात येत आहेत. आता गावाला टँकर शिवाय पर्याय नसल्याने अखेरचा उपाय म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनाच मैदानावर उतरावे लागले.
उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने वीज कनेक्शनसाठी अकरा लाख रुपयांचे कोटेशन ५ मार्च रोजी भरले आहे. याबाबत विचारणा केली असता कोटेशनची रक्कम भरल्याची माहिती नसल्याचे महावितरणचे उपकार्यकारी अभियंता राजू आडम यांनी सांगितले. तथापी अधिक माहिती घेऊन डीपीसाठी ताबडतोब टेंडर काढून काम पूर्ण घेणार असल्याचे सांगितले.
समर्थनगर ग्रामपंचायतीच्या सहकार्याने पाणी वळसंग येथील फिल्टर प्लांटमध्ये घेण्याचा प्रयत्न झाला, पण सदोष वितरिकेमुळे पाणी फिल्टर प्लांटमध्ये आलेच नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पाणीपुरवठा विहिरीत पाणी सोडण्यास सांगितल्यानेपाणी उच्च दाबाने गावाला मिळण्याची शक्यता आहे. तसेच विहिरीच्या अवतीभवती यापूर्वीच खडी व वाळू टाकल्याने त्यातून पाझरून पाणी विहिरीत जाणार आहे. त्याचबरोबर या परिसरातील बेसॉल्ट खडकाच्या थरामुळे पाण्याचा अपव्यय होणार नाही.
योजनेचे फायदे
कुरनूर धरणातून १४ ते १५ तास पाणी उपसा झाल्यास समाधानकारक पाणीपुरवठा होऊ शकतो.
शासनाचा दरवर्षी टँकरवर होणारा लाखो रुपयांचा खर्च वाचणार
प्रती कुटुंब दोन ते तीन हजार रुपये मासिक पाणीपुरवठा खर्च वाचणार
आमदार कल्याणशेट्टी यांचेही प्रयत्न
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी कुरनूर येथील शेतकऱ्यांची समजूत काढल्याने या योजनेला गती मिळाली. या योजनेतील केवळ ६० मीटर पाईप जोडण्यासाठी जवळपास सहा महिन्यांचा कालावधी लागला. याकरता सरपंच जगदीश अंटद, उपसरपंच समीर कटरे, माजी सरपंच श्रीशैल दुधगी, माजी तंटामुक्त अध्यक्ष बुडन कटरे, ग्रामपंचायत सदस्य शालम अमलिंचुगे, मलकप्पा कोडले, श्रीशैल भुसणगी, विनोद सुरपुरे, सामाजिक कार्यकर्ते अनिल बर्वे, सिद्धाराम तिपराधी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपविभागीय अभियंता सुनील देशपांडे, कनिष्ठ अभियंता सुधीर गोरे यांनी वेळोवेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची भेट घेऊन हा विषय मार्गी लावण्याची विनंती केली होती.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.