Pesticide : कीटकनाशके फवारताना काळजी घ्यावी

Crop Pest Management : कीटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी आणि गुलाबी बोंडअळी नियंत्रण कसे करावे यासाठी प्रत्यक्ष शेतात जाऊन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. १३) शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
Pesticide
Pesticide Agrowon
Published on
Updated on

Nanded News : कीटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी आणि गुलाबी बोंडअळी नियंत्रण कसे करावे यासाठी प्रत्यक्ष शेतात जाऊन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. १३) शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

जिल्हाभरातील शेतकऱ्यांना या कार्यक्रमाच्या फेसबुक लाईव्हवरून मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली नांदुसा (ता. नांदेड) येथे संजय जनकवाडे यांच्या शेतात कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हा परिषदेच्या कृषी विभाग व राज्य शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने

Pesticide
Pesticide Nozzle : फवारणीसाठी योग्य गुणवत्तेच्या नोझलची निवड

हा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विजय बेतीवार यांनी प्रास्ताविकात गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण व कीटकनाशक फवारताना घ्यावयाची काळजी, कीटकनाशकाचे प्रकार, त्याची तीव्रता व खरेदी करताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.

गुलाबी बोंडअळीची जीवन साखळी तोडल्याशिवाय त्यावर नियंत्रण मिळणार नाही. शेतकऱ्यांनी कृषी विभाग तसेच विद्यापीठ शास्त्रज्ञांनी शिफारस केलेल्या औषधाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले. कीटकनाशकाचे धोके तसेच विषबाधा झाल्यास प्रथमोपचार काय करावेत याबाबत नांदेड कापूस संशोधन केंद्राचे प्रा. अरविंद पांडागळे यांनी माहिती दिली.

Pesticide
Biological Pesticides : जैविक कीटकनाशक असलेल्या सूक्ष्मजीवांच्या चार स्ट्रेन्सची नोंदणी

शास्त्रज्ञ डॉ. बस्वराज भेदे यांनी कापूस पिकावरील बोंडअळीचे नियंत्रण करण्यासाठी एकात्मिक कीड नियंत्रण तसेच रासायनिक कीटकनाशक वापरून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना सांगितल्या.

पोखर्णी येथील शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख यांनीही मार्गदर्शन केले. या वेळी शेतकऱ्यांना फवारणी करताना वापरावयाच्या सेफ्टी किटचे तसेच गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी फेरोमन ट्रॅपचे वाटप करण्यात आहे. कृषी विभागामार्फत जागृती करण्यात येणाऱ्या मोबाइल डिजिटल व्हॅनचे उद्‍घाटन करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com