Bogus Pesticide : बनावट कीटकनाशके जप्त

Agriculture Commissionerate : कृषी आयुक्तालयाच्या दक्षता पथकाने केलेल्या धाडसी कारवाईत ३५ लाख रुपयांची बनावट कीटकनाशके जप्त केली आहेत.
Agriculture Pesticides
Agriculture PesticidesAgrowon
Published on
Updated on

Pune News : कृषी आयुक्तालयाच्या दक्षता पथकाने केलेल्या धाडसी कारवाईत ३५ लाख रुपयांची बनावट कीटकनाशके जप्त केली आहेत. कृषी आयुक्तपदाची सूत्रे रवींद्र बिनवडे यांनी हाती घेताच दक्षता पथकाला कार्यान्वित केल्यामुळे ही कारवाई झाल्याचे सांगण्यात येते. कीटकनाशकाचा साठा पुण्याच्या लोणी काळभोर भागात महादेव फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीच्या गोदामात लपविण्यात आला होता.

दक्षता पथकाचे अधीक्षक गोविंद मोरे, उपसंचालक किरण जाधव, तंत्र अधिकारी नरेंद्र बारापत्रे व सत्यवान नह्रे यांच्या चमूने सापळा रचून हा साठा बुधवारी (ता. २४) जप्त केला. आंबा बागांमध्ये मोहोर आणण्यासाठी राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात पॅक्लोब्युट्राझोल नावाचे वाढ वृद्धिरोधक वापरतात. याच संधीचा फायदा घेण्यासाठी बनावट कीटकनाशके वापरणाऱ्या टोळीकडून कमी किमतीची रसायने आणली जात होती.

Agriculture Pesticides
Pesticide Use : किडनाशके फवारताना अशी काळजी घ्या होणार नाही विषबाधा

ही रसायने म्हणजे आंब्याला मोहर आणणारे पॅक्लोब्युट्राझोल असल्याचे भासवले जात होते. कृषी खात्याच्या म्हणण्यानुसार, शेतकऱ्यांना हे रसायन ‘कल्टार’ नावाने सर्रास विकले जात होते. या बाबत शोध घेताना गोदाम मालकाने हा साठा दाखवला व पैसे घेऊन येण्यास सांगितले. गोदाम मालकाकडे कीटकनाशके विक्री, साठवणुकीचा परवाना नव्हता.

Agriculture Pesticides
Pesticide Advisory : कीडनाशकांचा वापर काळजीपूर्वक करा : ढगे

परिस्थितीचा अंदाज घेत कीटकनाशके कायदा १९६८ व कीटकनाशके नियम १९७१ मधील तरतुदींचा भंग होत असल्याचा निष्कर्ष काढत दक्षता पथकाने रसायनांचा साठा तत्काळ जप्त केला. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, साठा जप्त करण्यात आल्यानंतर तेथे पॅक्लोब्युट्राझोल सोबत इतर बनावट कीटकनाशकेदेखील आढळली.

त्यात नॅप्थॅलिक अॅसिटिक अॅसिड, पॉलिथिलिन गायकोल, इमामेक्टिन बेंझोएट, इमिडाक्लोप्रिड, फेनोब्युकार्ब, थायोफोनेट मिथाईल, हेक्झाकोनॅझोल, सायपेरमेथ्रिन याचा समावेश होता. शेतकऱ्यांकडून या कीटकनाशकांना मोठी मागणी असते.

अनेक टोळ्या कार्यरत

या कारवाईत जप्त केलेल्या रसायनांचे नमुने आता प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले आहेत. तसेच, फौजदारी दाखल करण्याच्या हालचाली सुरू आहेत. दरम्यान, राज्यात बनावट कीटकनाशके, खते, बियाणे विक्रीत अनेक टोळ्या कार्यरत असल्याचा संशय आहेत. धक्कादायक बाब म्हणजे कृषी खात्यातील काही अधिकारीदेखील या टोळ्यांना सामील आहेत. त्यामुळेच बनावट निविष्ठांची विक्री थांबत नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com