
Baramati News: मे महिन्यात झालेल्या मॉन्सूनपूर्व आणि अवकाळी पावसाने बारामती कृषी उपविभागातील पुरंदर, बारामती, दौंड आणि इंदापूर तालुक्यांतील ४६ हजार २९६ शेतकऱ्यांचे १४ कोटी ६६ लाख ५५ हजार ६३५ रुपये नुकसान झाले, अशी माहिती उपविभागीय कृषी अधिकारी टी. के. चौधरी यांनी दिली.
चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ हजार ३७२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. यामध्ये फळपिकांचे सुमारे ७८२ हेक्टर क्षेत्र बाधित होऊन ३,१९८ शेतकऱ्यांचे १ कोटी ७६ लाख ६६ हजार ७७५ रुपये आणि बागायत पिकांचे ७ हजार ५८७ हेक्टर क्षेत्र बाधित होऊन ४३,०९८ शेतकऱ्यांचे १२ कोटी ८९ लाख ८८ हजार ८६० रुपये नुकसान झाले.
अपर आयुक्त (महसूल), पुणे आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या १६ आणि १७ जूनच्या पत्रांद्वारे अनुदान मागणीचा प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे निर्देश तालुका कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचेही चौधरी यांनी सांगितले.
प्रमुख पिकांचे नुकसान
विविध पिकांमध्ये पेरू, सीताफळ, अंजीर, केळी, द्राक्ष, पपई, संत्रा, लिंबू, आंबा, चिंच, जांभूळ, नारळ यांसारख्या फळबागांसह भुईमूग, फुलपिके, भाजीपाला, कांदा, ऊस, सोयाबीन, कापूस, उडीद, बाजरी, सूर्यफूल, मका आणि चारा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
शासनाचे अनुदान निकष
शासन निर्णय १ जानेवारी २०२४ नुसार, नुकसानभरपाईसाठी खालील दर ठरविण्यात आले आहेत
शासनाचे अनुदान निकष
शासन निर्णय १ जानेवारी २०२४ नुसार, नुकसानभरपाईसाठी खालील दर ठरविण्यात आले आहेत
जिरायत पिके : १३,६०० रुपये प्रतिहेक्टर
बागायत पिके : २७,००० रुपये प्रतिहेक्टर
फळपिके : ३६,००० रुपये प्रतिहेक्टर
मर्यादा : ३ हेक्टरपर्यंत
तालुकानिहाय पिकांचे नुकसान
तालुका शेतकरी बाधित क्षेत्र बाधित आणि नुकसान (कोटी रुपयांमध्ये)
इंदापूर २६,३१९ २,०३८.०६ ३ कोटी ५४ लाख ७८ हजार १५
दौंड १०,२७५ ३,०३२.०९ ५ कोटी २० लाख १५ हजार ७४०
बारामती ८,१९७ २,८५९.०६ ५ कोटी १४ लाख ४ हजार
पुरंदर १,५०५ ४४३.५३ ७७ लाख ५७ हजार ९५ रुपये
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.