Poultry Farming : परसबागेतील कुक्कुटपालन, नव्हे छोटे ‘एटीएम’ !

Diwali Article 2024 : अल्प, अत्यल्प भूधारक, भूमिहीनांच्या जगण्यामध्ये परसबागेतील कुक्कुटपालन महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
Poultry Farming
Poultry FarmingAgrowon
Published on
Updated on

Poultry Farming Management : ग्रामीण भागात बहुतेकांकडे किमान एक, दोन गाई, बैलाचा छोटा तरी गोठा आणि अवतीभवती वावरणाऱ्या काही कोंबड्या असा बारदाना तर नक्कीच असतो. गाय बैलासारखे मोठे पशू पाळणे भूमिहीन किंवा अत्यल्प भूधारकाला शक्य होईलच असे नाही, पण चार ते २० कोंबड्या सहजपणे पाळता येतात. प्रत्यक्ष कोंबड्या व अंड्याच्या विक्रीतून होणाऱ्या अर्थार्जनावर उदरनिर्वाहाला मोठा हातभार लागतो.

अकोला जिल्‍ह्यातील मोरगाव भाकरे येथील अनंत ज्ञानदेव वाघ यांच्याकडे तीन एकर शेती आहे. ते स्वतः दिव्यांग आहेत. त्यांच्या चारजणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह प्रामुख्याने शेतीवरच अवलंबून आहे. दिव्यांग असल्याने शेतीतील अनेक कष्टाची कामे करणे त्यांना शक्य नसले तरी मजुरांच्या साह्याने भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. त्याची विक्रीही स्वतः करतात. मुळात काठ्यांच्या आधाराशिवाय चालता येत नसतानाही करत असलेली ही सारी धडपड धडधाकट तरुणांनाही लाजवेल अशी आहे. शेतीला जोड म्हणून मागील सात-आठ वर्षांपासून ते परसबाग कुक्कुटपालन करतात. या छोट्याशा व्यवसायातून फारशा कष्टाशिवाय वर्षभरात ५०-६० हजारांची मिळकत होत असल्याचे ते सांगतात.

Poultry Farming
Poultry Feed Management : कोंबड्यांना कोणत्या खाद्यातून मिळेल ऊर्जा, प्रथिने, जीवनसत्वे

याच गावातील पवन कवर हे तसे मोठे शेतकरी. त्यामुळे त्यांच्याकडे विविध पिके, मशागतीसह अन्य कामांसाठी ट्रॅक्टरसह अनेक यंत्रे व अवजारे, भरपूर गडीमाणसे यांचा राबता. तरीही त्यांच्याकडे गेल्या चाळीस वर्षे आजोबापासून परसबागेतील कुक्कुटपालन जोपासलेले आहे. आज तिसरी पिढीही हा वारसा जोपासत आहे. पक्ष्यांची संख्या कमी अधिक झाली तरी कधी खंड मात्र पडला नाही. आजही त्यांच्याकडे ३५ ते ४० कोंबड्या आहेत. यापासून दररोज मिळणारी अंडी १५ रुपये नगाप्रमाणे विकली जातात. या गावात अनेकांकडे अशा प्रकारे कोंबड्या पाळलेल्या आहेत. कुणाच्या शेतात, कुणी गोठ्यात तर कुणी घराच्या एका कोपऱ्यात एकतरी खुराडे जपलेले आहे. त्यामुळे गावात दिवसाला शंभर-दीडशे अंडी मिळतात.

Poultry Farming
Poultry Farming : वाढत तापमान कोंबड्यांसाठी तापदायक

परसबागेतील कुक्कुटपालनात प्रामुख्याने गावरान, जातिवंत कोंबड्या मुक्त स्वरूपामध्ये पाळल्या जातात. शेडमध्ये बंदिस्त कोंबडीपालनाप्रमाणे यात खाद्यान्नावर व व्यवस्थापनावर फारसा खर्च होत नाही. दिवसभरातून सकाळ-संध्याकाळ थोडेफार खाद्य दिले जाते. या

कोंबड्या घर, शेत व परिसरातील किडे, पडलेले धान्य व गोठा परिसरातील शेणामध्ये वाढणारे लहानमोठे कीटक यावर आपले पोट भरतात.

अकोल्यातील मोरगाव भाकरेसारखी अनेक गावे या भागात पाहायला मिळतात. प्रत्येक गावात किमान दहा-वीसजण तरी कोंबड्या पाळतात. त्यांच्याकडे ५ पासून ५० कोंबड्या असतात. त्यातून घरच्या पोषक आहाराची गरज पूर्ण होण्यासोबत घरातील महिलांच्या हाती चार पैसे खेळते राहतात. या देशी कोंबड्यांच्या जातीमध्येही आता नव्या सुधारित व अधिक उत्पादनक्षम जाती संशोधनातून उपलब्ध होत आहेत. त्याला कृषी विभागासह शासकीय यंत्रणा पाठबळ देत आहेत.

माफसूने मोरगावमध्ये कोंबडीपालनाचे कीट दिले होते. केव्हीके, आत्माच्या पुढाकाराने प्रात्यक्षिकांसह कोंबड्यांची पिल्ले, खाद्य, पाणी-खाद्य भांडे व औषधे पुरविण्यात आले होते. तसा बिनभांडवली व्यवसाय असला तरी त्यातही काही अडचणी येत असतात. उन्हाळ्यातील चार ते पाच महिने अति उष्णतामानामध्ये मरतुकीचे प्रमाण वाढते. भटकी कुत्री, मांजर आणि मुंगूस हेसुद्धा पक्ष्यांना लक्ष्य करतात.

(संपूर्ण लेख वाचा अॅग्रोवन दिवाळी अंकात...)

अंकासाठी संपर्क-९८८१५९८८१५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com