Team Agrowon
कोंबड्यांना सकस,पौष्टिक आणि संतुलित खाद्य मिळाले तरच मांस किंवा अंडी वजनदार मिळतात, कोंबड्यांची मरतूक कमी होते.
कोंबड्यांना खाद्य देताना पिल्लांना द्यायच खाद्य, ब्रॉयलर आणि लेअर कोंबड्यांना द्यायच खाद्य अशा तीन प्रकारात वेगवेगळं नियोजन करावं लागतं.
कोंबड्यांना देण्यात येणारा संतुलित आहार मुख्यतः मका आणि तेल विरहित सोयाबीन पेंड यापासून तयार करतात. याचबरोबरीने ऊर्जा, प्रथिने, चरबी, खनिजे, जीवनसत्त्व असे विविध घटक असलेले स्रोत यामध्ये उपयोगात आणले जातात.
कोंबड्यांना उर्जेचा पुरवठा होण्यासाठी खाद्यातून भरडधान्य जसे की, मका , ज्वारी , बाजरी, गहू, तांदळाचा पुरवठा करावा.
विविध प्रकारच्या पेंडीतून कोंबड्यांना प्रथिनांचा पुरवठा होत असतो. यामध्ये सोयाबीन, भुईमूग, सरकी, मोहरी,गवार, सूर्यफूल,तीळ,जवस यासारख्या तेलबियांच्या पेंडीचा समावेश होतो.
कोंबड्यांना चरबीचा पुरवठा होण्यासाठी वनस्पतिजन्य स्रोत जसे की, सोया तेल, पाम तेल, शेंगदाणा तेल दिले जाते. तर प्राणिजन्य स्रोतामध्ये विविध जनावरांच्या चरबीचा समावेश होतो.
क्षार खनिजापासून मिळतात, तर जीवनसत्त्वाचे स्रोत मोठ्या पशुखाद्य व्यावसायिकांना विदेशातून उपलब्ध होतात. हे घटक कमी प्रमाणात खाद्यातून दिले जातात.
Sugarcane Fertilizer Management : आडसाली उसात असा करा खतांचा वापर