Team Agrowon
वातावरणातील बदलानुसार व्यवस्थापनात बदल करावे लागतात. वातावरणातील तापमान वाढल्यास कोंबड्यामध्ये हिट स्ट्रेस तयार होतो. ब्रॉयलर (broiler) पक्षामध्ये वातावरण, नियोजन यांसारख्या गोष्टीमुळे तणाव निर्माण होतो.
सरळ परिणाम उत्पादनावर दिसून येतो. सध्या वातावरणातील तापमानाची पातळी वाढत चालली आहे. तापमान वाढले की हवेतील आर्द्रता कमी होत असते. जास्त तापमानात शरीरात पाण्याची गरज जास्त भासू लागते.
उष्ण तापमानात कोंबड्या उष्माघातास लवकर बळी पडतात. मृत्यू दर वाढल्यास आर्थिक नुकसान सहन करावे लागते. सध्या तापमानाची पातळी वाढत चालली आहे. वाढलेल्या तापमानामुळे हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी होते.
उन्हाळ्यात ब्रॉयलरच्या शरीरावर खुप मोठा परिणाम होताना दिसतो. शरीरातून उष्णता मुक्त होण्याचे प्रमाण व शरीरात उष्णता निर्माण होण्याचं प्रमाण या प्रमाणात बदल झाल्यास त्याचे परिणाम दिसून येते.
कोंबड्यांचे पाणी पिण्याचे प्रमाण वाढून, खाद्य खाण्याचे प्रमाण कमी होते. -खाल्लेल्या खाद्यांचे शरीरात वजन वाढीसाठी उपयोग न होता ते वाया जाते व वाढीवर परिणाम होतो.
शरीरातील रक्तप्रवाह वेगाने होतो. - रोग प्रतिकार क्षमता कमी होते व पक्षी दगावण्याची शक्यता वाढते.