Farmers Issues : बच्चू कडू, जानकरांचा सरकारविरोधात संघर्ष

Protest Update : विधानसभा निवडणुकीपूर्वी घोषणा केल्यानुसार शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी त्यासोबतच मेंढपाळांच्या विविध प्रश्नांना घेत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांचे नेतृत्वात मंगळवारपासून (ता. सात) विभागीय आयुक्त कार्यालयावर वाडा आंदोलनाची सुरुवात करण्यात आली.
Bacchu Kadu Protest
Bacchu Kadu ProtestAgrowon
Published on
Updated on

Amravati News : विधानसभा निवडणुकीपूर्वी घोषणा केल्यानुसार शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी त्यासोबतच मेंढपाळांच्या विविध प्रश्नांना घेत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांचे नेतृत्वात मंगळवारपासून (ता. सात) विभागीय आयुक्त कार्यालयावर वाडा आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. राष्ट्रीय समाज पक्षाची नेते महादेव जानकर हे देखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गाडगे महाराज समाधी मंदिरापासून मेंढपाळांचा मोर्चा काढण्यात आला. पंचवटी चौक, गर्ल्स हायस्कूल चौक, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर हा मोर्चा धडकला. त्याठिकाणी दोन्ही नेत्यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढत ‘आर या पार’चा लढा देण्याचा इशारा दिला.

Bacchu Kadu Protest
Farmers Protest : उच्चाधिकार समितीने घेतली जगजित डल्लेवाल यांची भेट

देशात १८ टक्के असलेल्या धनगर समाजावर सातत्याने अन्याय होत असून एकही खासदार व आमदार लोकसभेत तथा विधिमंडळात निवडून जाऊ दिला गेला नाही. जाती-धर्माच्या नावाने निवडणुका केंद्रित करण्यात आल्या आणि आमच्या सारख्या सामान्य तसेच लोकांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांचा पराभव करण्यात आल्याचे महादेव जानकर यावेळी म्हणाले. सरकारने मेंढपाळ बांधवांकरिता असलेल्या योजनांसाठी निधी दिला नाही तर यापुढे मोठे आंदोलन करू, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

Bacchu Kadu Protest
Farmer Issue : सरकारी योजनांसाठी धोंडिबाची वणवण

हा मोर्चा म्हणजे एक झलक असून यानंतरही मेंढपाळ बांधवांवर प्रशासन तसेच पोलिस यंत्रणेकडून दमन करण्यात आले तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारासुद्धा त्यांनी दिला. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष ‘महागद्दार’ असल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणातून केला.

यावेळी मोर्चाला संबोधित करताना बच्चू कडू म्हणाले, की देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती, मात्र आता त्या घोषणेचा त्यांना विसर पडला आहे. मग जनतेला आधीच का खोटे आश्वासन दिले, अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांसाठी सरकारच्या विरोधात मोठे आंदोलन उभारणार असल्याची घोषणा यावेळी बच्चू कडू यांनी केली. मोर्चाचे स्वरूप पाहता मार्गावर ठिकठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com