Fertilizer
FertilizerAgrowon

Chemical Fertilizers : रासायनिक खतांची उपलब्धता ४५ लाख टनांच्या पुढे राहणार

Fertilizers Update : येत्या खरिपात चांगला पेरा होण्याची शक्यता गृहीत धरीत रासायनिक खतांची उपलब्धता ४५ लाख टनांच्या पुढे ठेवण्यासाठी नियोजन सुरू आहे, अशी माहिती कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.
Published on

Pune News : येत्या खरिपात चांगला पेरा होण्याची शक्यता गृहीत धरीत रासायनिक खतांची उपलब्धता ४५ लाख टनांच्या पुढे ठेवण्यासाठी नियोजन सुरू आहे, अशी माहिती कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.

Fertilizer
Agriculture Fertilizers : खरिपासाठी १ लाख २३ हजार ३०० टन खते मंजूर

राज्याचा मागील खत वापर आणि चांगल्या मॉन्सूनचा (Monsoon) अंदाज बघता यंदा खताला मागणी टिकून राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. खरिपात सर्वाधिक विक्री युरियाची होत असते. यंदा राज्यात विक्रीसाठी १३.७३ लाख टन युरिया उपलब्ध करून देण्यास केंद्राने मान्यता दिली आहे. याशिवाय बाजारात पाच लाख टन डीएपी, १.३० लाख टन एमओपी, ७.५० लाख टन एसएसपी आणि अंदाजे १८ लाख टन संयुक्त खते द्यावीत,

अशा सूचना केंद्रीय रसायने व खते मंत्रालय कंपन्यांना देईल. बाजारपेठांमधील रासायनिक खतांच्या यापूर्वीच्या हंगामातील विक्रीचा मागोवा घेतल्यास २०२२ मधील खरिपात शेतकऱ्यांनी ३७.६८ लाख टन खते विकत घेतली. गेल्या खरिपात केंद्राने ४३ लाख टन खते विकण्यास मान्यता दिली होती.

Fertilizer
Fertilizer Management : खरिपासाठी ८५ हजार ४५१ टन रासायनिक खते मंजूर

हा साठा गृहीत धरल्यास खरिपातील एकूण खत उपलब्धता ६१ लाख टनांपुढे होती. प्रत्यक्षात हंगामात झालेली विक्री ४४.५६ लाख टन आहे. खरीप २०२३ हंगामाअखेर नियोजनानुसार खत विक्री झाली नाही. रब्बीमधील २५ लाख टन खते शिल्लक आहेत.

यातून सध्याची थोडीफार विक्री बघता काही साठा खरिपासाठी उपलब्ध होईल. हा शिल्लक साठा १६.८५ लाख टनांच्या आसपास राहील. त्यामुळे चालू खरिपासाठी केंद्राने मंजूर केलेला ४५.५३ लाख टनांचा कोटा पुरेसा आहे, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

रासायनिक खत वापराची वाटचाल (आकडे लाख टनांत)

वर्ष खरीप रब्बी एकूण गेल्या वर्षीच्या तुलनेतील वाढ (+) किंवा घट (-) टक्केवारीत

२०१८-१९ ३६.३१ २३.७७ ६०.०८ २.६१ (-)

२०१९-२० ३३.६४ २७.६९ ६१.३३ २.०८ (+)

२०२०-२१ ४६.९५ २६.७२ ७३.६७ २०.१२ (+)

२०२१-२२ ४३.५२ २७.१५ ७०.६७ ४.०५ (+)

२०२२-२३ ३७.६८ २७.०५ ६४.७३ ५.९५ (+)

२०२३-२४ ४४.५६ २०.०१ ६४.५७ ०.२४ (-)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com