Water Crisis
Water Crisis Agrowon

Water Crisis : आष्टी तलावात उरला केवळ ६ टक्के पाणीसाठा

Water Scarcity : आष्टी (ता. मोहोळ) येथील ऐतिहासिक आष्टी तलावात केवळ सहा टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने या तलावाच्या पाण्याच्या अवलंबून असणारी सुमारे ३ हजार एकरांवरील फळबागा व अन्य पिके धोक्यात आली आहेत.
Published on

Solapur News : आष्टी (ता. मोहोळ) येथील ऐतिहासिक आष्टी तलावात केवळ सहा टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने या तलावाच्या पाण्याच्या अवलंबून असणारी सुमारे ३ हजार एकरांवरील फळबागा व अन्य पिके धोक्यात आली आहेत. आष्टी तलावात उजनीचे पाणी सोडावे, अन्यथा शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास नष्ट होणार आहे.

आष्टी येथील तलावाची पाणी साठवण क्षमता पाऊण टीएमसी इतकी आहे, याच पाण्यावर पापरी, खंडाळी, रोपळे, येवती व पेनुर यासह अन्य गावातील शेतकऱ्यांनी ऊस, मका या पिकांसह द्राक्ष, डाळिंब, पेरू, सिताफळ, केळी या फळबागांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे.

शेतकऱ्यांनी विविध बँकांची कोट्यवधी रुपयांची कर्ज घेऊन आपल्या शेतापर्यंत जलवाहिन्या टाकून ही पिके जगवण्यासाठी पाणी उपलब्ध केले आहे, याच तलावातून आठ गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनाही कार्यान्वित आहेत.

Water Crisis
Water Scarcity : गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पाणीसाठा

आष्टी उपसा सिंचन योजनेच्या कालव्याला वेळोवेळी आवर्तन सोडल्याने तलावातील पाणीसाठा कमी होत आहे. पाण्याने अक्षरशः तळ गाठला आहे. सध्या अनेक शेतकऱ्यांच्या केळी, डाळिंब, पेरू या फळबागा उतरणी प्रक्रियेत आहेत. मात्र त्यांना पाणी कमी पडले तर त्यांचे मोठे नुकसान होणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांत ऊस लागवडी केल्या आहेत.

Water Crisis
Water Scarcity : धामणी नदी कोरडी; सात गावांना पाणी टंचाईची झळ

पावसाळा आणखी तीन महिने लांब आहे. तोपर्यंत शेतातील उभी पिके जगविण्या बरोबरच पिण्यासाठीही पाणी राखीव ठेवणे गरजेचे आहे. पाऊस कधी पडतो हे माहिती नसल्याने शासन शेतकऱ्यांनी राखीव कोट्यातील पाणी उपसा करू नये यासाठी विद्युत पुरवठा खंडित करण्याचे आदेश देते. शेतीला जोडधंदा म्हणून ग्रामीण भागात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. एका शेतकऱ्याकडे किमान दहा गाई असतात. त्या गाईंना पिण्यासाठी पाणी लागते.

आष्टी तलावातील पाण्यावर माझे ४ ते ५ एकर क्षेत्र बागायत आहे. तसेच माझा दुग्ध व्यवसाय असल्याने जर्सी गाईंचीही संख्या मोठी आहे. आष्टी तलावात लवकर पाणी न सोडल्यास जनावरांच्या पिण्याच्या व चारा पिकाच्या पाण्यासाठी मोठी अडचण होणार आहे. त्यासाठी त्वरित पाणी सोडावे.
-चंद्रकांत भोसले, शेतकरी, पापरी, ता. मोहोळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com