Water Scarcity : गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पाणीसाठा

Water Crisis : अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतांश भागात आता पाणीटंचाई जाणवू लागली आहे. मात्र धरणातील उपलब्ध पाण्याचा विचार केला तर गतवर्षीपेक्षा यंदा सद्यःस्थितीत मध्यम आणि मोठ्या धरणांत ४५.१० टक्के पाणी उपलब्ध आहे.
Water Storage
Water StorageAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतांश भागात आता पाणीटंचाई जाणवू लागली आहे. मात्र धरणातील उपलब्ध पाण्याचा विचार केला तर गतवर्षीपेक्षा यंदा सद्यःस्थितीत मध्यम आणि मोठ्या धरणांत ४५.१० टक्के पाणी उपलब्ध आहे. त्यात भंडारदऱ्यात ६५ टक्के, तर मुळात पन्नास टक्के पाणी उपलब्ध आहे. गेल्यावर्षी मार्च अखेरीस ३८ टक्के पाणी उपलब्ध होते. असे असले तरी यंदा उन्हाची तीव्रता अधिक असल्याने पाणी मागणीनुसार नियोजन करावे लागणार असल्याचे दिसतेय.

अहिल्यानगर जिल्ह्यात दक्षिणेतील भंडारदरा, निळवंडे आणि मुळा या मोठ्या प्रकल्पासह दक्षिण जिल्ह्यात आढळा, मांडओहळ, घाटशीळ पारगाव, सीना, खैरी, विसापूर हे मध्यम प्रकल्प आहेत. भंडारदरा, निळवंडे आणि मुळा या मोठ्या धरणात ४५ टीएमसी तर मध्यम प्रकल्पात साडेपाच टीएमसी पाणी साठवण क्षमता आहे.

त्यातील ४३ टीएमसी पाणीसाठा उपयुक्त आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात एकूण पाणीसाठ्याच्या ३८ टक्के (१९ टीएमसी) पाणी मार्चअखेरीस उपलब्ध होते. गतवर्षीच्या पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने यंदा गतवर्षीपेक्षा अधिक पाणी म्हणजे २३ टीएमसी (४५.१० टक्के) उपलब्ध आहे. यंदा भंडारदऱ्यात गतवर्षीपेक्षा वीस टक्के, मुळात तीन टक्के, निळवंडेत २२ टक्के, सीनात १७ टक्के पाणी अधिक शिल्लक आहे.

Water Storage
Water Scarcity : पैनगंगा नदीकाठच्या ४४ गावांवर भीषण पाणीटंचाईचे संकट

गतवर्षीपेक्षा सध्याचा विचार करता मोठ्यासह मध्यम प्रकल्पात पाणी अधिक शिल्लक असले तरी यंदा गतवर्षीपेक्षा पंधरा ते वीस दिवस आधीच उन्हाच्या झळा, पाणीटंचाई जाणवू लागली. यंदा विहिरी, विंधन विहिरी आणि गाव तलावाची पाणीपातळी अचानक झपाट्याने खाली गेली.

Water Storage
Satara Water Scarcity : साताऱ्यातील टंचाई निवारण्यासाठी १४.६१ कोटींचा आराखडा

त्याचा परिणाम शेतीपिकांवर झाल्याचे दिसत आहे. मोठ्या धरणांतून पाण्याचे आवर्तन सुरू आहेत. अजून उन्हाळ्याचे अडीच महिने आहेत. उन्हाची तीव्रता पाहता उपलब्ध पाण्याचा विचार करून नियोजन झाले नाही तर अधिक पाणी असूनही टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.

धरणातील सध्याचा व कंसात गतवर्षीचा पाणीसाठा (टक्के)

भंडारदरा ६५.८१ (४५.१४)

मुळा ५०.७० (४७.०५)

निळवंडे ३६.४९ (१४.६९)

आढळा ६४.७२ (६२.३६)

मांडओहळ २२.७८ (११.२३)

घाटशीळ पारगाव १२.३६ (०.०६)

सीना ४२.२१ (२५.८०)

खैरी ३५.७१ (१६.८१)

विसापूर २८.१३ (१५.४७)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com