Mumbai Water Cut : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये ९.६९ टक्के पाणीसाठा; प्रशासनाने घेतला १० टक्के पाणीकपातीचा निर्णय

Mumbai Water Supply : राज्यात गेल्या वर्षी कमी झालेल्या पावसाचा फटका यंदा विविध जिल्ह्यांना बसत आहे. यामुळे अनेक ठिकाणी पाणी टंचाई भीषण होत असून अनेक ठिकाणी पाणीकपात केली जात आहे.
Mumbai Water Supply
Mumbai Water SupplyAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्याच्या वाढत्या पाणी टंचाईमुळे विविध जिल्ह्यातील सर्वसामान्यांवर पाणी टंचाईचे संकंट गडद झाले आहे. यादरम्यान मुंबईकरांवर पाणीकपातीची तलवार पडली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. तर यंदा गतवर्षीच्या तुलनेत ५.६४ टक्के पाणीसाठा कमी झाला असून ९.६९ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे महापालिका प्रशासनाने १० टक्के पाणीकपातीचा निर्णय घेतला असून तो लागू केला आहे.

गेल्या अनेक दिवसापासून मुंबईत पाणीकपात होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र महापालिका प्रशासनाने त्या शक्यता बाजूला सारत पाणीकपात केली जाणार नाही असे वारंवार म्हटले होते. मात्र आता पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयातच पाणी घटल्याने प्रशासनास खडबडून जाग आली आहे. यावरूनच हा निर्णय घेण्यात आला आहे.

Mumbai Water Supply
Parbhani city Water supply : अखेर भर उन्हाळ्यात तोडलेला वीजपुरवठा सुरळीत; परभणी शहराला पाणीपुरवठा सुरळीत

तसेच पालिका प्रशासनाने ही पाणीकपात गुरूवार दिनांक ३० मे २०२४ पासून लागू करताना आधी ५ टक्के आणि ५ जून २०२४ नंतर १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. तर शहरवासियांनी पाणीकपातीच्या निर्णयावरून घाबरून जाऊ नये. पाण्याचा काटकसरीने वापर करताना अपव्यय टाळावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तर हवामान खात्याने यंदा मॉन्सूनबाबत वर्तवलेला अंदाज व्यक्त करताना, तो वेळेवर दाखल होईल असे म्हटले होते. जी सकारात्मक बाब असल्याचे म्हटले आहे.

गेल्या वर्षी कमी झालेल्या पावसामुळे राज्यातील कोणतीच धरणे भरली नव्हती. असेच चित्र मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचे होते. यामुळे यंदा मुंबईकरांची पाणीकपात करण्यात आली आहे.

आज २५ मे रोजी प्राप्त धरणातील पाणीसाठ्याच्या आकडेवारीनुसार मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये फक्त ९.६९ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. जो एकूण १ लाख ४० हजार २०२ दशलक्ष लीटर आहे. मुंबईच्या पाण्याची मागणी पाहता भातसा धरणातून १,३७,००० दशलक्ष आणि अप्पर वैतरणा धरणातून ९१,१३० दशलक्ष लिटर पाण्याची पुर्तता करण्यात येणार आहे.

Mumbai Water Supply
Water Supply : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांत २८.९३ टक्के पाणीसाठा; जुलैपर्यंत पाणी पुरणार

दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका व इतर गावांना करण्यात येणाऱ्या पाण्यात देखील कपात करण्यात आली आहे. येथे देखील ५ टक्के आणि १० टक्के कपात लागू करण्यात आली असून ठरलेल्या तारखेपासून पाणीकपात होईल.

महापालिका प्रशासनाच्या नागरिकांना सूचना

पाणीकपात लागू करताना महापालिकेने नागरीकांना आवाहन केले होते. याप्रमाणेच महापालिका प्रशासनाने नागरीकांना काही सूचना देखील केल्या आहेत.

पाण्याचा वापर काटकसरीने करताना पाणी बचत करावी.

अंघोळीसाठी शॉवरचा वापर टाळून बादलीतील पाण्याचा वापर करावा.

नळ सुरू ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळावे असे म्हटले आहे.

महापालिका प्रशासनाच्या नागरिकांना सूचना

पाण्याचे नळ वाहते ठेवून घरकाम करू नये.

घरातील लादी, धुन्या ऐवजी पुसून घ्यावे.

आदल्या दिवसाचे पाणी शिळे म्हणून ओतू नये

उपाहारगृहे, हॉटेल्सनी बारीक पाणी पडणाऱ्या विशेष तोट्यांचा वापर करावा. तसेच ग्राहकाच्या आवश्यकतेनुसार पाणी द्यावे अन्यथा पाण्याची बाटली द्यावी अशा सूचनाही महापालिका प्रशासनाने केल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com