Mumbai Municipality : मुंबईकरांना दिलासा!, येत्‍या पावसाळयापर्यंत मिळणार पाणी; महापालिकेचा निर्णय

Water shortage : अजून मार्च महिना संपायचा आहे. तर उन्हाळा संपायला दोन महिने शिल्लक असतानाच राज्यावर दुष्काळाचे सावट घोंगावत आहे. यादरम्यान मुंबईकरांसाठी चिंता वाढली असतानाच आता मुंबई महापालिकेने नागरिकांची चिंता मिटवणारी घोषणा केली आहे.
Mumbai Municipality
Mumbai MunicipalityAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यातील अनेक धरणातील पाणीसाठा कमी झाला असून मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये ३२.३२ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली होती. तर पाणीकपातीची तलवार मुंबईकरांवर लटकत होती. यादरम्यान मुंबईकरांना दिलासा देताना असा कोणताही निर्णय माहापालिका प्रशासन घेणार नसून येत्या पावसाळ्यापर्यंत मुंबईकरांना पुरेसा पाणी पुरवठा केला जाईल. पाणीपुरवठ्यात कपात केली जाणार नाही अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. 

राज्यात उन्हाचा तडाखा वाढला असून यामुळे राज्यातील धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. अनेक जिल्ह्यांमधील धरणातील पाणी साठ्याने तळ गाठला आहे. तर अनेक धरणांप्रमाणे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये देखील पाणीसाठा घटला आहे.  मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा, मध्य वैतरणा, उर्ध्व वैतरणा, तुळशी, मोडक सागर, भातसा, विहार या धरणांमध्ये ३२.३२ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. 

Mumbai Municipality
Water shortage : छत्रपती संभाजी नगर, बीड, यवतमाळला पाणी टंचाईच्या झळा; मुंबईकरांच्या चिंतेतही वाढ

यामुळे मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाने दिल्या होत्या. यानंतर आता महापालिका प्रशासनाने मुंबईकरांसाठी येत्या पावसाळ्यापर्यंत पाणी पुरेल असे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे पाणीपुरवठ्यात कपात न करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. 

Mumbai Municipality
Water shortage in Karnataka : कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये पाणीबाणी, १४ हजारपैकी ७ हजार बोअरवेल पडले बंद

तसेच मुंबईकरांना पुरेसा पाणीपुरवठा व्हावा यासाठी राज्‍य शासनानेदेखील ‘निभावणी साठ्या’तून पाणी उपलब्‍ध करून दिले आहे. यामुळे सद्यस्थितीत मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यात कोणतीच कपात केली जाणार नाही, असेही असे प्रशासनामार्फत स्पष्ट करण्यात येत आहे.

राज्यात ३९.७६ टक्के पाणीसाठा 

राज्यात लहान मोठी असे मिळून एकूण धरणे २,९९४ असून मार्च महिन्याच्या शेवटी धरणांमध्ये ३९.७६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा राज्यातील सहा महसूल विभागांतील धरणांमध्ये आहे. तर सध्या राज्यात ३ हजार गावांना ९४० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून गेल्या वर्षी मार्च महिन्यात फक्त २१ गावे आणि ७३ वाड्यावस्त्यांना पाणी पुरवठा केला जात होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com