Parbhani city Water supply : अखेर भर उन्हाळ्यात तोडलेला वीजपुरवठा सुरळीत; परभणी शहराला पाणीपुरवठा सुरळीत

Parbhani Power supply cut off : भर उन्हाळ्यात परभणी शहराला पाणीपुवरठा करणाऱ्या योजनेचा वीजपुरवठा महावितरणने तोडला होता. यामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिक भरडा गेला होता. मात्र आता वीजपुरवठा सुरळीत झाल्याने जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा देखील सुरळीत झाला आहे.
Parbhani city Water supply
Parbhani city Water supplyAgrowon

Pune News : राज्यात विविध जिल्ह्यात सध्या तापमान वाढले असून परभणीत देखील पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. सर्वसामान्यांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत असतानाच महावितरणने महापालिकेला शॉक दिला होता. महावितरणने मनपाला पाणीपुरवठा करणाऱ्या धर्मापुरी येथील जलशुद्धीकरण केंद्राचा विद्युत पुरवठा खंडित केला होता. यामुळे पाणीपुरवठ्यात अडचणी आल्या होत्या. यानंतर शहरासह उपनगरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. पण महापालिकेने महावितरणची थकीत देय रक्कम अदा केल्याने खंडित केलेला विद्युत पुरवठा जोडण्यात आला आहे.

महावितरणने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धर्मापुरी येथील जलशुद्धीकरण केंद्राचा विद्युत पुरवठा खंडित केला होता. यानंतर भर उन्हाळ्यात शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. यामुळे नागरीकांना त्रास सहन करावा लागला होता. यानंतर शहरवासियांनी मनपाने महावितरणला थकीत देय रक्कम भरून पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी भावना व्यक्त केली होती.

Parbhani city Water supply
Water Supply : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांत २८.९३ टक्के पाणीसाठा; जुलैपर्यंत पाणी पुरणार

यानंतर महापालिकेने शुक्रवारी (ता.१७) महावितरणला काही थकीत देयकाची रक्कम भरली. यामुळे खंडित केलेला विद्युत पुरवठा जोडण्यात आला आहे. मात्र या थकीत देय रक्कमेवरून गेल्या काही महिन्यापासून महापालिका व विद्युत वितरण कंपनीत वाद सुरू होता. यामुळे नागरिक वेठीस धरले जात होते. दरम्यान बुधवारी महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राचा विद्युत पुरवठा विद्युत वितरण कंपनीने खंडित केला होता.

यावरून हा प्रश्न पाण्याशी निगडीत असून महावितरण कंपनीने त्यांच्या थकबाकी देय रक्कमेवरून मनपाचा वीजपुरवठा खंडीत करावा पण पाणीपुरवठा योजना सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करावे असी भावना बोलून दाखवली होती. मात्र लोक भावनेचा विचार न करता महावितरण कंपनीने विद्युत पुरवठा खंडित केला.

Parbhani city Water supply
Water Storage : चिंताजनक! देशातील प्रमुख जलाशयांमध्ये केवळ २५% पाणीसाठा, राज्याचीही स्थिती बिकट

यानंतर लोक भावनचा विचार करता महावितरण कंपनी सहकार्याची भूमिका घेतली. तर महानगरपालिका प्रशासनाने यावर कायमस्वरूपी उपाययोजनेची तयारी करत काही रक्कम महावितरणला देय केली. ज्यामुळे दुपारनंतर महावितरणने खंडित केलेला विद्युत पुरवठा पुन्हा जोडल्याची माहिची महापालिकेचे विद्युत अभियंता मिर्झा तनवीर बेग यांनी दिली.

शहराला पाणीटंचाईच्या झळा

उन्हाच्या झळा वाढत असतानाच शहराला पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. वारंवार वीजपुरवठा खंडित आणि इतर कारणाने शहरात नियमित पाणीपुरवठा होत नाही. यामुळे देखील पाण्यासाठी वाट पाहण्याची वेळ शहरवासियांवर येत आहे. यादरम्यान वीजपुरवठा खंडित झाल्याने बुधवारनंतर तब्बल तीन दिवस पाण्यासाठी ताटकळत बसण्याची वेळ शहरवासियांवर आली होती.

मनपा कायमस्वरूपी तोडगा काढणार का?

दरम्यान शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलविद्यूत केंद्राचा वीजपुरवठाच महावितरणने तोडल्यानंतर मनपाला जाग आली आहे. महावितरणच्या सहकार्यानंतर आणि काही रक्कम देय केल्यानंतर पुन्हा एकदा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. पण महावितरणची थकलेली कोट्यावधीची थकबाकीचा प्रश्न जैसे थे आहे. यावरून वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. यामुळे महानगरपालिका आर्थिक अडचणींवर कसा मार्ग काढणार का? असा सवाल आता शहरवासियांतून विचारला जात आहे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com