Water Scarcity : पाण्याच्या आशेने करमाळ्यात विहिरींची खोदाई

Well Digging : सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर घटली आहे, अशा परिस्थितीत पाण्यासाठी विहिरी, बोअर घेण्याचे प्रमाण वाढले आहे.
Well Digging
Well Digging Agrowon

Solapur News : सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर घटली आहे, अशा परिस्थितीत पाण्यासाठी विहिरी, बोअर घेण्याचे प्रमाण वाढले आहे. करमाळा तालुक्यात शेतकऱ्यांकडून अनेक भागांत वहिरी खोदण्याची कामे सुरू आहेत. अलीकडे पोकलेनने विहिरी खोदण्याचे काम वेगाने होते. त्यामुळे विहिरींची खोदाईही वाढली आहे.

करमाळा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विहिरी खोदल्या जात आहेत. उजनी धरणाची पाणी पातळी उणे ४१ टक्क्यांपर्यंत गेली आहे. या परिस्थितीत पाण्यासाठी उजनी परिसरात देखील मोठ्या प्रमाणावर विहिरी खोदल्या जात आहेत. काही विहिरी पोकलेनने खोदल्या जात आहेत. मात्र काही विहिरी क्रेनने खोदण्यात येत आहेत.

Well Digging
Water Scarcity : मराठवाड्यात हजारांवर गाववाड्यांना पाणीटंचाईच्या झळा

५० फुटांपर्यंत पोकलेन विहीर खोदण्याची सोय आहे, मात्र ५० फुटांपेक्षा जास्त खोल विहीर खोदायचे असल्यास क्रेन शिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे पाणीपातळी घटल्याने पन्नास फुटांपेक्षा देखील खोल विहिरी खोदण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पोकलेनसह क्रेन व्यवसायिकांच्या व्यवसायानेही जोर धरला आहे.

Well Digging
Water Scarcity : पाण्यासाठी महिलांची एक किमी पायपीट

विशेषत: रोजगार हमी योजनेतील मंजूर विहिरींचाही यात समावेश आहे. सध्या तालुक्यात क्रेनच्या साह्याने ५० फूट खोल व २५ फूट रुंद विहीर खोदण्यासाठी साधारणपणे साडेचार ते पाच लाख रुपये घेतले जात आहेत.

एका क्रेनवर क्रेन चालवण्यासाठी एक प्रिंट करण्यासाठी एक व क्रेनमधून आलेली पाटी खाली करण्यासाठी एक आणि विहिरीमध्ये काम करण्यासाठी साधारणपणे आठ ते नऊ असे सर्वसाधारण दहा ते बारा मजुरांना काम मिळते आहे. त्यासाठी या मजुरांना ५७५ रुपये रोजगार मिळतो. तर क्रेनचे भाडे आठशे रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत घेतले जाते. किती विहिरींना पाणी लागणार, किती टिकणार, हा भाग वेगळा असला, तरी केवळ पाण्याच्या आशेने विहिरी घेणाऱ्यांची संख्या मात्र वाढली आहे.

वीस वर्षांपासून माझ्याकडे क्रेन आहे. दरवर्षी सहा ते सात विहिरी खोदून होतात, गेली तीन-चार वर्षांत पोकलेन विहिरी खोदण्याचे प्रमाण वाढल्याने क्रेनला काम मिळणे अवघड होते, मात्र या वर्षी पुन्हा क्रेनने विहिरी करण्याचे प्रमाण वाढले आहे.
- सुभाष आवटे, क्रेन मालक वीट, ता. करमाळा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com