Nana Patole : राष्ट्रपती राजवट लागू करा

Law and Order Situation : राज्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती चिंताजनक असून, हे ‘गुंडाराज’ बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दादर येथील टिळक भवनात पत्रकार परिषदेत केली.
Nana Patole
Nana PatoleAgrowon

Mumbai News : महाराष्ट्रात कायद्याचे तीन-तेरा वाजले असून, गुडांना कसलीच भीती राहिलेली नाही. उल्हासनगर, जळगाव, यवतमाळमधील गोळीबाराच्या घटनांनंतर आता मुंबईत माजी नगरसेवकाची झालेली हत्या, अशा गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना वाढत असून, ही महाराष्ट्रासाठी अत्यंत गंभीर आणि चिंतेची बाब आहे.

मुख्यमंत्र्यांचा ‘वर्षा’ बंगला, तसेच मंत्रालयात गुडांचा वावर बिनदिक्कतपणे सुरू आहे. तडीपार गुडांना राजाश्रय, पोलिस दलामधील राजकीय हस्तक्षेप आणि दबावामुळे पोलिसही हतबल आहेत. राज्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती चिंताजनक असून, हे ‘गुंडाराज’ बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी (ता.९) दादर येथील टिळक भवनात पत्रकार परिषदेत केली.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नागसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी (ता.९) पत्रकार परिषदेत पटोले यांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात थोडीशीही नैतिकता शिल्लक असेल आणि जनाची नाही तर मनाची लाज असेल, तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करताना पटोले यांनी राज्यातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्‍नावर काँग्रेसचे शिष्टमंडळ उद्या, शनिवारी (ता.१०) राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती दिली.

Nana Patole
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांचं पुन्हा आमरण उपोषण

राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असतानाही देवेंद्र फडणवीस यांना त्याचे काहीच गांभीर्य नाही. ‘गाडीखाली कुत्रा आला तरीही विरोधक गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील’ असे बेजबाबदार वक्तव्य करून त्यांनी आपल्या लाचारी आणि हतबलतेचे दर्शनच घडवले आहे. फडणवीस यांना माणूस, कुत्रा याच्यातील फरकही कळत नाही का, महाराष्ट्रात आता कायद्याचे राज्य राहिले नाही.

भाजप सरकारमुळे महाराष्ट्र गुन्हेगारीत देशात पहिल्या नंबरवर आहे. अवैध बंदुकीच्या बाबतीत नागपूरचा पहिला नंबर लागतो. त्यानंतर ठाणे, मुंबई आणि पुणे या शहरांचा नंबर लागतो, अशी टीका पटोले यांनी केली. राज्यात खैरात वाटल्यासारखे बंदुकांचे परवाने दिले जात आहेत. तडीपार गुंडांना पोलिस संरक्षण दिले जात आहे.

Nana Patole
CM Eknath Shinde : इचलकरंजी पाणी प्रश्न पेटणार, मुख्यमंत्री शिंदेंना काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय

काही भ्रष्ट आणि कलंकित आयपीएस अधिकाऱ्यांना नियम डावलून पदोन्नती दिली आहे, तर प्रामाणिक आणि इमानदार अधिकाऱ्यांचे खच्चीकरण केले जात आहे. पोलिस दलात प्रचंड राजकीय हस्तक्षेप आणि दबाव असल्याने तेही काही कारवाई करू शकत नाहीत. गुंडांनी शासन, प्रशासनासमोर आव्हान उभे केले आहे, असे पटोले म्हणाले.

फेसबुक लाइव्हनंतर ठाकरे गटाच्या नेत्याची हत्या

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक यांची गुरुवारी (ता.८) दहिसर येथे मॉरिस नोरोन्हा या गुंडाने गोळ्या झाडून हत्या केली. अभिषेक आणि मॉरिस नावाचा गुंड या दोघांनी समझोता झाल्यानंतर एकत्र फेसबुक लाइव्ह केले. हे लाइव्ह संपत असतानाच त्याने अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडल्या.

काही वेळातच अभिषेक यांचा मृत्यू झाल्यानंतर दहिसर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. शुक्रवारी शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह आमदार आणि खासदारांनी अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. या घटनेनंतर विरोधकांनी मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे, तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com