Van Bhushan Award : यंदापासून २० लाखांचा महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार

Agriculture Award : राज्यातील वन्यजीव क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना यंदापासून २० लाख रुपयांचा महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे.
Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarAgrowon

Mumbai News : राज्यातील वन्यजीव क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना यंदापासून २० लाख रुपयांचा महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. राज्य सरकारने तसे आदेश दिले आहेत. त्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती तयार करण्यात आली आहे.

पुरस्कार शोध आणि छाननीसाठी वनविभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील तसेच प्रधान मुख्य वनसंरक्षक सदस्य सचिव असलेली आठ सदस्यीय समिती असेल. गैरसरकारी संसाधनांचा वापर करून लोकजागर व लोकचवळीतून वन आणि वनिकी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येईल.

Sudhir Mungantiwar
Agriculture Award : वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार जाहीर

यासाठी जैवविविधता संगोपन, वनसंवर्धन, वन्यजीव संवर्धन, मृदा व जलसंधारण, नैसर्गिक संसाधनांचा पर्याप्त वापर, पर्यावरण सजगता, महत्त्वाचे दस्ताऐवजीकरण, वनेतर क्षेत्रामध्ये वनीकरण आदी शाखांमध्ये उल्लेखनीय आणि असाधारण काम केलेल्या व्यक्तीचा या पुरस्कारासाठी विचार केला जाईल. या पुरस्कारासाठी शासकीय, निमशासकीय, अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचारी अर्ज करू शकणार नाहीत.

Sudhir Mungantiwar
Agriculture Award : ‘कृषी’तील योगदानासाठी डॉ. गडाख यांना पुरस्कार

या पुरस्कार निवडीची छाननी व शोध घेण्यासाठी अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय समिती नेमली आहे. या समितीत सहअध्यक्ष प्रधान मुख्य वनसंरक्षक असतील. तसेच वन व वानिकी क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, या क्षेत्रात प्रभावी काम करणारा प्रतिनिधी, कृषी विद्यापीठांतील वन व वनिकी क्षेत्रातील तज्ज्ञ प्रतिनिधी, सेवानिवृत्त वन अधिकारी, आवश्यकतेनुसार निमंत्रित व्यक्ती हे सदस्य असतील. तर निवड समितीचे अध्यक्ष वनमंत्री सुधीर मुनगंटीवार असतील.

पुरस्काराकरिता निवड समितीने शिफारस केलेल्या व्यक्तींना पुरस्कार देण्याबाबत शासन अंतिम निर्णय घेईल. पुरस्काराचे स्वरूप आणि निकष यामध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्याचे अधिकार शासनाचे असतील, असे शासन आदेशात म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com