CM Eknath Shinde : इचलकरंजी पाणी प्रश्न पेटणार, मुख्यमंत्री शिंदेंना काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय

Sulkud Yojana : इचलकरंजी दौऱ्यावेळी काळे झेंडे दाखविण्याचा निर्णय इचलकरंजी सुळकूड योजना कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
CM Eknath Shinde
CM Eknath Shindeagrowon

Ichalkaranji Water Issue : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या गावी शेतात जाऊन काम करण्यास वेळ आहे; पण इचलकरंजीच्या जिव्हाळ्याच्या सुळकूड योजनेच्या पाणी प्रश्नावर बैठक घेण्यास वेळ नाही. त्याच्या निषेधार्थ आगामी इचलकरंजी दौऱ्यावेळी काळे झेंडे दाखविण्याचा निर्णय इचलकरंजी सुळकूड योजना कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात समितीची व्यापक बैठक घेण्यात आली.

यावेळी खासदार धैर्यशील माने व आमदार प्रकाश आवाडे यांच्यावर कठोर शब्दांत टीका करण्यात आली. इचलकरंजी शहरासाठी मंजूर झालेल्या सुळकूड योजना सुरू करण्याच्या प्रश्नावर शासन पातळीवर बैठक होणार होती. मात्र, त्याबाबत हालचाली पूर्णतः बंद आहेत. त्यामुळे याप्रश्नी पुन्हा एकदा लढा उभारण्यासाठी आज बैठक पार पडली.

निमंत्रक प्रताप होगाडे यांनी पुढील लढ्याची दिशा यावेळी जाहीर केली. कृती समितीमध्ये सत्ताधारी आता सोबत नसल्याचे निदर्शनास आणून देत यापुढे पुन्हा एकदा विभागवार बैठका घेवून जनजागृती केली जाईल, महिन्याभराच्या वाटचालीनंतर २५ हजार लोक रस्त्यावर उतरतील, अशी परिस्थीती निर्माण केली जाईल, असे त्यांनी यावेळी जाहीर केले.

आमदार आवाडे यांनी कृती समितीवर बिनकामाची टोळी असल्याची टीका केली होती. त्याला जोरदार प्रत्युत्तर या बैठकीत देण्यात आले. 'हीच टोळी तुम्हाला निवडून आणत होती आणि आता ती पाडूही शकते', असा इशारा होगाडे यांनी दिला.

'विधानसभा निवडणुकीत यातील तुमच्यासोबत काहीजण होते, त्यावेळी तुम्ही टोळीप्रमुख होता काय', असा सवाल शशांक बावचकर यांनी उपस्थित केला. 'भाजपच्या संगतीमुळे टोळी असा ते असंविधानिक शब्द वापरत आहेत', अशी टोकाही त्यांनी केली.

'पाणी प्रश्नावर बैठक घेण्याचे सांगून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करुन खासदार धैर्यशील माने व आमदार आवाडे यांनी नागरिकांची फसवणूक केली आहे. आम्ही जर टोळीवाले आहोत, तर मग तुम्हाला दरोडेखोर म्हणायचे काय', असा संतप्त सवाल कारंडे यांनी यावेळी उपस्थित करीत तुमचा इतिहास काढला तर तुमची अडचण होईल, अशा इशाराही दिला.

'इचलकरंजीने दिलेल्या बहुमताची जाण खासदार माने यांनी ठेवावी', अशी रोखठोक भूमिका त्यांनी यावेळी मांडली. यावेळी राहुल खंजिरे, नितीन जांभळे, सयाजी चव्हाण, पुंडलिक जाधव, भरमा कांबळे, प्रकाश मोरबाळे, सदा मलाबादे, अभिजीत पटवा, सावित्री हजारे, विकास चौगुले, राहल सातपुते, शशिकांत देसाई, शिवाजी साळुंखे, सुनिल बारवाडे, नूरमहमंद बेळकूडे, अमृत भाटले, मनोहर जोशी, डॉ. अरुण पाटील, माधुरी सातपुते, राजू कोनूर, प्रताप पाटील, सुरेश गणबावडे, रघुनाथ जमदाडे, संजय डाके, बजरंग लोणारी, दौलत पाटील आदीनी भूमिका मांडल्या, प्रास्ताविक प्रसाद कुलकर्णी यांनी केले.

CM Eknath Shinde
Milk Sangh Kolhapur : तर १५ हजार दूध संस्था रस्त्यावर उतरणार, सहाय्यक निबंधक कार्यालयावर धडक

रमेश पाटील यांचे सोमवारपासून उपोषण

सुळकूड योजनेची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी सोमवार (ता.१२) पासून प्रांत कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे रमेश पाटील यांनी बैठकीत जाहीर केले. तर शासनाकडे जमा होणारा विविध महसूल थांबविण्याच्या सूचनाही यावेळी विविध वक्त्यांनी केल्या.

९० टक्के आजार पाण्यामुळे

'शहरातील नागरिकांना ९० टक्के आजार हे पाण्यामुळे होत आहेत', अशी माहिती डॉ. अरुण पाटील यांनी यावेळी दिली. शहरवासीयांना दुषित पाणी दिले जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com