Food Grain Storage : शेतमाल वखार महामंडळाच्या गोदामात साठविण्याचे फायदे

Grain Storage : चांगला भाव मिळण्याच्या आशेने अनेक शेतकरी काढणीनंतर शेतमाल घरातच साठवून ठेवतात. शेतमाल घरात साठवून ठेवल्यामुळे दोन प्रकारे नुकसान होत. ते म्हणजे या धान्याची गुणवत्ता चांगली राहत नाही याशिवाय शेतमाल तसाच ठेवल्यामुळे पैशाची कमतरता भासते.
Grain Storage
Grain StorageAgrowon

Vakhar Corporation godown : चांगला भाव मिळण्याच्या आशेने अनेक शेतकरी काढणीनंतर शेतमाल घरातच साठवून ठेवतात. शेतमाल घरात साठवून ठेवल्यामुळे दोन प्रकारे नुकसान होत. ते म्हणजे या धान्याची गुणवत्ता चांगली राहत नाही याशिवाय शेतमाल तसाच ठेवल्यामुळे पैशाची कमतरता भासते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल घरात साठवून ठेवण्यापेक्षा वखार महामंडळाच्या गोदामात सुरक्षित साठवून ठेवावा. अजून गोदामातील शेतमाल साठवणूक कशी फायदेशीर आहे? याविषयी शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ प्रशांत चासकर यांनी दिलेली माहिती पाहूया. 

ज्या काळात सर्व शेतकरी एकाच वेळेस पिकाची काढणी करतात, त्याच वेळेस शेतमालाला बाजारभाव कमी मिळतो.  घरात शेतीमाल एवढी काळजी घेऊन साठवला जात नाही त्यामुळे धान्याची नासाडी ही होतेच. घरामध्ये  धान्याची पोती थरावर थर रचून ठेवली जातात. शेतमालाच कीटक व बुरशीपासून संरक्षण होण्यासाठी विषारी कीडनाशके, गोळ्या वापरल्या जातात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते.  त्यामुळे शेतमाल साठविण्यासाठी वखार महामंडळाच्या गोदामा सारख्या सुक्षीत जागेचा शेतकऱ्यांनी नक्की विचार करावा.  

Grain Storage
Warehouse Facilities : केंद्रीय वखार महामंडळाच्या विविध सुविधा

शेतकऱ्यांनी शेतीमाल घरात ठेवण्यापेक्षा महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात ठेवल्यास या शेतमालाला विमा संरक्षण तर मिळतच याशिवाय उंदीर, किडे, मुंग्या व बुरशी पासून संरक्षण ही होत. वखार महामंडळाच्या गोदामात शेतीमाल ठेवताना शासनाने मासिक भाड्याचे ठरविलेले दर हे अत्यंत कमी आहेत.  या शेतमालाला सुमारे ७ रुपये प्रति महिना प्रति पोते इतक्या कमी भाडं आकारल जात. ५० टक्के गोदाम भाड्यात सूटही मिळते. शेतकरी कंपनी असल्यास गोदाम भाड्यात २५ टक्के सूट मिळते. त्यानुसार गोदाम भाड्याचा हिशेब केल्यास सुमारे ४ ते ५ रुपये प्रती पोते मासिक भाड्यात शेतीमालाचे संरक्षण होऊ शकते. इतक्या कमी खर्चात जर आपल्या शेतमालाचे महिनाभर संरक्षण होत असेल तर शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घेतला पाहिजे.  

वखार महामंडळाच्या गोदामात शेतमाल सुरक्षीत राहण्यासाठी कोणत्या सुविधा आहेत ते पाहुया

उंदीर व घुशींपासून संरक्षण होण्यासाठी वखार महामंडळाच्या गोदामाची उंची ही जमिनीपासून सुमारे ३ फुटांपर्यंत असते.  गोदामाला ओलाव्यामुळे कोणतेही नुकसान होत नाही. प्रत्येक पोत्यांच्या थराखाली गोदामातील जमिनीलगत ड्रेनेज किंवा प्लॅस्टिकचा कागद अंथरला जातो जेणेकरून दमट हवामान किंवा पावसाळ्यातील ओलसर हवामानामुळे धान्यामध्ये जमिनीतील ओलावा शोषला जात नाही. त्यामुळे सुद्धा धान्याचे संरक्षण होते.गोदामाच्या छताला हवा खेळती राहण्यासाठी व प्रकाश गोदामात येण्यासाठी व्हेंटिलेटर्स बसविलेले असतात. गोदामातील खिडक्या समोरासमोर असल्याने हवा खेळती राहते. या खिडक्यांना जाळ्या बसविल्याने बाहेरील पक्षी गोदामात येऊन साठविलेल्या धान्याच नुकसान करत नाहीत. महामंडळामार्फत गोदाम आणि गोदामातील शेतीमालाला आग, चोरी व कर्मचाऱ्याकडून गैरवापर या तीन कारणांसाठी विम्याचे संरक्षण दिले जाते. आगी पासून संरक्षण व्हावे यासाठी आगरोधक यंत्रणासुद्धा गोदामात उपलब्ध आहे. 

शेतमाल तारण कर्ज

गोदामातील शेतमालावर गरज असल्यास ९ टक्के दराने तारण कर्जही काढता येत. किंवा महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने दिलेली वखार पावती किंवा गोदाम पावती कृषी उत्पन्न बाजार समितीकडे गहाण ठेवून त्यावर ६ टक्के दराने गरज असल्यास तारण कर्ज घेता येत. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची गोदाम सुविधा ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उभारलेली असते. ही व्यवस्था शेतकऱ्यांसाठीच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल वखार महामंडळाच्या गोदामातच ठेवण्यासाठी आग्रही असाव. यात शेतकरी कंपन्या व सहकारी संस्थांनी पुढाकार घेतल्यास नक्कीच या सुविधेचा फायदा शेतकऱ्याला मिळेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com