Mango Cultivation : आंब्याची अति घन लागवड केल्यास एकरी लाभ शक्य

Ranjit Singh Deol : फळबागेमध्ये आंबा हा अति घन लागवड पद्धतीने केल्यास फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना एकरी आर्थिक लाभ होईल, असे मत महाराष्ट्राचे शिक्षण खात्याचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांनी व्यक्त केले.
Ranjit Singh Deol
Ranjit Singh Deol Agrowon

Jalna News : शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आता फळबागांकडे वळणे गरजेचे आहे. फळबागेमध्ये आंबा हा अति घन लागवड पद्धतीने केल्यास फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना एकरी आर्थिक लाभ होईल, असे मत महाराष्ट्राचे शिक्षण खात्याचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांनी व्यक्त केले.

बदनापूर तालुक्यातील भराडखेडा येथील भाऊसाहेब घुगे यांच्या अति आधुनिक अशा अतिघन लागवड केसर आंबा बागेस तसेच बहाडोली जांभूळ, खजूर आणि मोसंबी बागेत डॉ. भगवानराव कापसे यांच्यासोबत श्री देओल यांनी नुकताच दौरा केला. या यावेळी शिवार फेरीत त्यांनी फळे, लागवडीची पद्धत व अति घन लागवड आंबा बागेचे तंत्रज्ञान डॉ. भगवानराव कापसे यांच्याकडून माहिती करून घेतले.

Ranjit Singh Deol
Mango Cultivation : आंबे लागवडीत श्रीवर्धन आघाडीवर

खजूरला संकरीकरण कसे करतात याविषयी त्यांनी सविस्तर समजून घेतले. शिवार फेरी संपल्यानंतर जमलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. श्री. देओल म्हणाले, ‘‘डॉ. कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली गटाने चार-पाचशे एकरवर आंबा केल्यास पुढे आपण त्यास जे शक्य होईल तेवढं साह्य शासनातर्फे करण्यासाठी मदत करू.’’ डॉ. कापसे म्हणाले, की श्री. देओल यांनी वेळेत वेळ काढून शेतकऱ्यांच्या बांधावर आले हा त्यांचा शेतकऱ्याविषयी असलेला खास आपुलकीचा परिणाम आहे.

Ranjit Singh Deol
Mango Advisory : आंबा सल्ला (कोकण विभाग)

उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी असे बांधावर येऊन शेतकऱ्यांचे प्रयोग व त्यांची गरज लक्षात घेणे गरजेचे आहे. या भागात ४०० ते ५०० एकरवर अतिघन लागवड पद्धतीने केसर आंबा करावा. त्यासाठी महाकेसरतर्फे संपूर्ण तंत्रज्ञान देऊन बदनापूर तालुक्यातच आंबा निर्यातीचे केंद्र उभे करता येईल. आंबा अतिघन पद्धतीने लागवड केल्यास तिसऱ्याच वर्षी कमीत कमी दोन टन उत्पन्न देतो. चार-पाच वर्षांत आठ-दहा टनापर्यंत उत्पन्न द्यायला सुरुवात करतो. यावेळी भाऊसाहेब यांचा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

या वेळी श्री घुगे यांनी ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’साठी केलेल्या कामाचे विवेचन केले. त्याचबरोबर या भागात मोठ्या प्रमाणात डॉ. कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबा व मोसंबीच्या बागा वाढवण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणात प्रयत्न करू. त्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी शेतकऱ्यांनी आंबा मोसंबीविषयी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. कापसे यांनी उत्तरे दिली. कार्यक्रमास विलास कापसे तथा परिसरातील मोठ्या प्रमाणात शेतकरी मंडळी उपस्थित होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com