Ladki Bahin Yojana : अमरावतीत लाडकी बहीण योजनेच्या अर्जावर आमदाराचा फोटो; छत्रपती संभाजीनगरमध्ये दलाली करणाऱ्या एका महिलेवर गुन्हा दाखल 

Ladki Bahin Yojana News : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. अमरावतीत चक्क आमदाराने आपला फोटो छापला आहे. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दलाली करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अमरावतीत देखील महिला या योजनेसाठी अर्ज भरत आहेत. यावरून आमदार देवेंद्र भुयार यांनी आपला फोटो लाडकी बहीण योजनेच्या अर्जावर लावत खळबळ उडवून दिली आहे. भुयार वरुड मोर्शी मतदारसंघाचे आमदार असून मतदारसंघात थेट अर्जांचे वाटप केले आहे. भुयार यांनी आपला फोटो असणारे अर्ज अंगणवाडी सेविकांमार्फत वाटप केले आहेत. त्यावरून काँग्रेसचे नेते विक्रम ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे. 

आमदार भुयार हे आधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणाऱ्या ओढामुळे संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी भुयार यांची हाकालपट्टी केली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर भुयार यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिला होता. तसेच महायुती सरकार स्थापनेच्या वेळी देखील त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता. यामुळे ते चांगेलच चर्चेत आले होते.

Ladki Bahin Yojana
Majhi Ladki Bahin Yojana : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज घरबसल्या भरता येणार

यानंतर आता राज्यात जोर धरणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जावर आपला फोटो छापल्याने भुयार पुन्हा एकदा प्रकाश झोतात आले आहेत. त्यावरून अमरावतीत काँग्रेस आक्रमक झाली आहे. तर भुयार यांच्यावर तातडीने फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे. भुयार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करताना आमदार भुयार मतदारसंघातील नागरिकांना मूर्ख बनवत असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला आहे

Ladki Bahin Yojana
Majhi Ladki Bahin Yojana : छत्रपती संभाजीनगरमध्ये ७९ हजार महिलांची नोंदणी

यादरम्यान या घटनेची माहिती तहसीलदारांना मिळताच त्यांनी भुयार यांचे फोटो असलेले अर्ज रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच रद्द करण्यात आलेले अर्ज पुन्हा भरण्याच्या सुचना तहसीलदारांनी दिल्या आहेत. घटलेल्या या प्रकारामुळे मात्र मतदारसंघातील महिलांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. तर आता पुन्हा भरण्यात येणाऱ्या अर्जावर कोणाचा फोटो नसेल याची काळजी घ्या. तसेच शासनाने दिलेले अर्जच भरा, असे आवाहन तहसीलदारांनी महिलांना केलं आहे. 

संभाजीनगरमध्ये एका महिलेवर गुन्हा दाखल

जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेंतर्गत अर्ज भरण्यासाठी दलाली करणाऱ्या एका महिलेचे पितळ उघडे पडले आहे. वंदना म्हस्के असे महिलेचे नाव असून तिच्यावर करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर ही महिला लाडकी बहीण योजनेसह शासनाच्या विविध योजनांचा लाभ मंजूर करून देण्यासाठी दलाली करत होती. ती निराधार, गरीब महिलांकडून पैसे उकळत होती. याबाबत काही महिलांनी करमाड तहसीलदारांकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीवरून महिलांचे जबाब घेत पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वंदना म्हस्के या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com