Fertilizer Sanction : नांदेडला दोन लाख टन खतांचे आवंटन मंजूर

Approval of Chemical Fertilizer : एप्रिल २०२४ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीसाठी जिल्ह्याला लागणाऱ्या दोन लाख सहा हजार मेट्रिक टन रासायनिक खताला कृषी आयुक्तालयाकडून मंजुरी मिळाल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी विभागाच्या सूत्राने दिली.
Fertilizer
FertilizerAgrowon
Published on
Updated on

Nanded News : आगामी खरीप हंगामाच्या तयारीसाठी कृषी विभाग कामाला लागला आहे. एप्रिल २०२४ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीसाठी जिल्ह्याला लागणाऱ्या दोन लाख सहा हजार मेट्रिक टन रासायनिक खताला कृषी आयुक्तालयाकडून मंजुरी मिळाल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी विभागाच्या सूत्राने दिली.

जिल्ह्यात हंगामी पिकांसह बागायती तसेच फळपिकांसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर होतो. मागील चार वर्षांत दरवर्षी दोन लाख टन खताचा वापर झाला आहे. या दृष्टीने कृषी विभाग दरवर्षी राज्याच्या कृषी आयुक्तालयाकडे जिल्ह्याला लागणाऱ्या खताची मागणी करतो. खरीप हंगाम २०२४-२०२५ साठी जिल्ह्याला दोन लाखांपक्षा अधिक खताची आवश्यकता भासणार आहे.

Fertilizer
Fertilizers Sales Issue : रासायनिक खतांच्या विक्रीतील अडसर दूर करा

तशी मागणी नुकतीच राज्याच्या कृषी आयुक्तालयाकडे करण्यात आली आहे. आगामी काळात लागणाऱ्या रासायनिक खताच्या नियोजनाबाबत लातूर विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर यांनी संबंधितांना नियोजन करण्याचे निर्देश दिले होते. तसेच शेतकऱ्यांना खरिपापूर्वी खताची टंचाई जाणवणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले.

जिल्ह्याला आगामी खरीप हंगामात लागणाऱ्या रासायनिक खताचा मागणी अहवाल नुकताच राज्याच्या कृषी आयुक्तांकडे सादर झाला आहे. त्यांनी लगेच नांदेडसाठी एप्रिल २०२४ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत लागणाऱ्या दोन लाख सहा हजार रासायनिक खतांच्या आवंटनास मंजुरी दिली आहे. या खतात युरिया.

डीएपी, एमओपी, एनपीके, एसएसपी या खतांचा समावेश आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा समतोल वापर करण्यासाठी माती परीक्षण करूनच रासायनिक खताचे नियोजन करावे, यासोबत सेंद्रिय, जैविक खतासह कंपोस्ट खताचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे तसेच कृषी विकास अधिकारी विजय बेतीवार यांनी केले आहे.

Fertilizer
Fertilizer Demand : खरीप हंगामासाठी १८ हजार ५६७ टन खतांची मागणी

जिल्ह्याला महिनानिहाय लागणारे खत

जिल्ह्यात पेरणीपूर्वीच शेतकरी रासायनिक खताची खरेदी करतात. यात प्रामुख्याने डीएपी, युरिया, एनपीके या खतांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. यंदाही जिल्ह्यात एप्रिल महिन्यात १२ हजार २२३ टन, मे २६ हजार ७६४ टन, जून महिन्यात ५३ हजार ९९ टन, जुले महिन्यात ४५ हजार १८२ टन, ऑगस्ट महिन्यात ३७ हजार ९८४ टन तर सप्टेंबरमध्ये २५ हजार ३४८ टन खताची आवश्यकता असल्याचे मागणीत म्हटले आहे.

खरिपासाठी ग्रेडनिहाय मंजूर रासायनिक खताचे आवंटन (खत मेट्रिक टनांत)

खताचा प्रकार मंजूर आवंटन

युरिया ५३,९००

डीएपी ३३,३००

एमओपी ०८,०००

एनपीके ७९,८००

एसएसपी २५,६००

एकूण ०२,००,६००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com