Fertilizer Demand : खरीप हंगामासाठी १८ हजार ५६७ टन खतांची मागणी

Kharif Season 2024 : खरीप हंगामासाठी १८ हजार ५६७ टन खतांची मागणी कृषी विभागामार्फत करण्यात आली आहे.
Fertilizer
FertilizerAgrowon

Sindhudurg News : खरीप हंगामासाठी १८ हजार ५६७ टन खतांची मागणी कृषी विभागामार्फत करण्यात आली आहे. एप्रिल अखेरपर्यंत खत उपलब्ध होण्यासाठी कृषी विभागाकडून नियोजन सुरू आहे.

खरीप हंगामात सिंधुदुर्गात भातपीक लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. जिल्ह्यात गत वर्षी ६२ हजार हेक्टरवर भातपीक लागवड होती. याशिवाय जिल्ह्यात नाचणीसह इतर पिकांना देखील खताची गरज भासते. जिल्ह्यात पावसाळा सुरू झाल्यानतंर खत वितरणाची मोठी समस्या निर्माण होते.

Fertilizer
Fertilizer Stock : यंदाच्या खरीप हंगामासाठी ८८ हजार ७०० टन खतसाठा मंजूर

त्यामुळे मे महिन्यात खत वितरण प्रकिया पार पाडावी लागते. जिल्ह्यात बहुतांशी गावात सहकारी सोसायट्यांमार्फत खत वितरण होते. दरम्यान या वर्षी खरीप हंगामासाठी कृषी विभागाने १८ हजार ५६७ टन खताची मागणी विविध कंपन्यांकडे केली आहे.

Fertilizer
Fertilizer Use : रासायनिक खतविरोधी प्रचारानंतरही वाढला वापर

एप्रिल अखेरपर्यंत खताचा पुरवठा करावा, अशी मागणी देखील कृषी विभागाने कंपन्यांकडे केली आहे.रासायनिक खतांसोबत यावर्षीपासून सेंद्रिय खतावर भर द्यावा यादृष्टीने कृषी विभागाने आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. याशिवाय भात बियाण्यांची मागणीसाठी लवकरच खरीप हंगाम आढावा नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.

नाव मागणी (टनांमध्ये)

युरिया ७५०७

डीएपी १०४९

एमओपी ९७०

सिंगल सुपर फॉस्फेट २०१५

खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेत खत आणि भातबियाणे मिळावी यासाठी कृषी विभागाने सुरू केले आहे. याशिवाय सुधारित, संकरित बियाणे देखील वेळेत उपलब्ध होण्यासाठी नियोजन सुरू आहे. बोगस खत खत विक्रीपासून शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी.
-जानबा झगडे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com