Fertilizers Sales Issue : रासायनिक खतांच्या विक्रीतील अडसर दूर करा

Demand on Remove barriers to fertilizer sales : रासायनिक खतांच्या गोण्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चित्रे आहेत. लोकसभा निवडणुकीसंबंधी आचारसंहितेचा फटका यातून बसत असल्याने हा अडसर दूर करावा.
Fertilizer Sale Issue
Fertilizer Sale IssueAgrowon

Jalgaon News : रासायनिक खतांच्या गोण्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चित्रे आहेत. लोकसभा निवडणुकीसंबंधी आचारसंहितेचा फटका यातून बसत असल्याने हा अडसर दूर करावा, प्रशासनाने कार्यवाही करावी, अशी मागणी केली जात आहे.

शेतातील पिकांच्या जोमदार वाढीसाठी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या रासायनिक खतांवर शासन सबसिडी देत असते. ती सबसिडी बंद केल्याने खतांच्या गोणींच्या किमतीत मागील अनेक वर्षांपासून सातत्याने वाढ होत आहे. खते कितीही महागडी झाली तरी शेतकऱ्यांना घ्यावीच लागतात. खतांच्या गोणीवर शासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र छापले आहेत, त्या छायाचित्र असलेल्या गोण्या दुकानदार अनेक वर्षांपासून विक्री करीत आहेत.

Fertilizer Sale Issue
Fertilizer Demand : खरीप हंगामासाठी १८ हजार ५६७ टन खतांची मागणी

मात्र आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्याने राजकीय पक्ष, त्यांची चिन्हे आणि त्यांच्या फोटो असलेली कोणतीही वस्तू, बॅनर, नाव आणि फोटो असलेल्या कोणत्याही साहित्याने जाहिरात होईल, असे करू नये अथवा वापरू नये, असे स्पष्ट आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

परिणामी, निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र गोणीवर असल्यामुळे खतांची उपयुक्तता असूनही शेतकऱ्यांना विकता येत नसल्याने दुकानदारांची मोठी अडचण झाली आहे. मोठ्या प्रमाणात खताचा साठा असूनही शेतकरी खत घेण्यासाठी आलेले असतानाही आचारसंहितेच्या बंधनात खत विक्री करता येत नसल्याने शेतकऱ्याना नेमके काय सांगावे, असा प्रश्न दुकानदारांना भेडसावत आहे.

Fertilizer Sale Issue
Fertilizer Use : रासायनिक खतविरोधी प्रचारानंतरही वाढला वापर

दुकानदार लाख रुपये भांडवल खर्च करून खत खरेदी करतात आणि ते खत तत्काळ विक्री गेली तर भांडवल मोकळे होते. परंतु आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी खत विक्री करता येत नाही. लाखो रुपये भांडवल गुंतवून दुकानदारांना शेतकऱ्यांना खत विकता येत नसल्याने दुकानदारासह शेतकरी अडचणीत सापडले आहेत, ही समस्या दूर करा, अशी मागणी केली जात आहे.

मागील काही वर्षांपासून रासायनिक खतांच्या गोण्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आल्याने खत विक्री करताना प्रचंड अडचण निर्माण होत होती. त्यातच आता आचारसंहिता लागू झाल्याने निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार खताच्या गोण्या विक्री करता येत नाही. शेतकरी खते घेण्यासाठी येतात. परंतु फोटो असल्यामुळे शेतकऱ्यांना देता येत नाही आणि शेतकऱ्याचा गैरसमज होत आहे.
संजय पाटील, खत विक्रेते, वावडे (ता. अमळनेर, जि.जळगाव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com