Maharudra Mangnale : सगळ्या जगण्याचं मोजमाप फक्त पैशात

Palas Tree : सहा वर्षांपूर्वी हे पळसाचं झाड म्हणजे एक छोटसं झुडूप होतं. एकच मुख्य खोड ठेऊन, त्याची सतत छाटणी करीत राहिलो. आणि झुडूपाचं छान झाड बनलं.
Palas Tree
Palas TreeAgrowon

Importance of Tree : सहा वर्षांपूर्वी हे पळसाचं झाड म्हणजे एक छोटसं झुडूप होतं. एकच मुख्य खोड ठेऊन, त्याची सतत छाटणी करीत राहिलो. आणि झुडूपाचं छान झाड बनलं. येत्या हंगामात याला लालचुटूक फुलं लागतील आणि फुलांसोबत मी एक सेल्फी काढेन. हे झुडूप वाढवताना एवढंच एक स्वप्न बघितलं होतं. त्याची पूर्तता होईल. माझी सगळीच स्वप्नं अशी जमिनीवरची, माझ्या आवाक्यातील आहेत.

Palas Tree
Maharudra Mangnale : माझ्या जगण्याची प्रेरणा शेतीच!

माझ्या बालपणी विहीरीजवळ एक मोठं पिंपळाचं आणि पळसाचं झाड होतं. ती कधीतरी तोडली गेली. पण ती झाडं माझ्या मनाच्या कप्प्यात घर करून होती. पिंपळ बहरलाय. पाठोपाठ हा पळसही. फुललेला पळस बघताना मजा येते. कुठंही तो दिसला की, मी हमखास फोटो काढतो. आमच्या शेजारच्या माळावर आठ-दहा पळसाची झाडं होती. करोना काळात सगळी लेकरं, कुत्री घेऊन मी त्या माळावर फिरायला जायचो. लेकरांना आणि कुत्र्यांनाही झाडावर चढवून फोटो काढायचो.

Palas Tree
Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

दोघेही खूष. मी तर झाडाच्या टोकावर जायचो.महिना-दिड महिना हा आमचा आवडता खेळ होता. ते फिरायला जायचं खास आकर्षण होतं. पुढच्याच वर्षी शेतमालकाने इतर झाडांसोबत पळसाची सगळी झाडं तोडली. पहिल्यांदा बघितलं तेव्हा खूप वाईट वाटलं. अस्वस्थ झालो. शेतमालकाला सहज बोललो. तो म्हणाला, पळसाच्या झाडाचा काय उपेग हाय सर. मी म्हटलं, फुललेला पळस कधी बघितलाय काय तुम्ही? तो हसत बोलला, दरवर्षी फुलं लागतातचं की..त्यात काय येवढं! त्याचंही खरं होतं, फुलाचं कसलं सौंदर्य.. अन् कसलं काय! त्याचे काही पैसे होतात का?..

सगळ्या जगण्याचं मोजमाप फक्त पैशात... शेतकरी तर मजबूर आहे. बाकीच्याचं तरी दुसरं काय?

मी तेव्हाच ठरवलं होतं, आमच्या शेतात एक तरी पळस वाढवायचा, जोपासायचा.एक मस्त वाढलाय. दुसराही छान वाढतोय. मी खूष, आनंदी, समाधानी आहे. माझा हा आनंद कोणीच हिरावून घेऊ शकणार नाही. अगदी निसर्गसुध्दा! कसलाही दुष्काळ पडला तरी हे पळसाचं झाड जिवंत राहिलं. माझ्या आठवणी जिवंत ठेवत!

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com