Orchard Plantation : फळबाग योजनेमधून अकोला जिल्ह्यात ४०० हेक्टरवर लागवड

Horticulture : संत्रा, लिंबू, केळी या पिकांची यंदा सुमारे ४०० हेक्टरपर्यंत योजनेतून लागवड झाली असून, यंदा ८०० हेक्टरचे उद्दिष्ट घेण्यात आलेले आहे.
Fruit Crop
Orchard PlantationAgrowon
Published on
Updated on

Akola News : जिल्ह्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. संत्रा, लिंबू, केळी या पिकांची यंदा सुमारे ४०० हेक्टरपर्यंत योजनेतून लागवड झाली असून, यंदा ८०० हेक्टरचे उद्दिष्ट घेण्यात आलेले आहे.

जिल्ह्यात योजनेतून आंबा, पेरू, संत्रा, कागदी लिंबू, मोसंबी, सीताफळ, आवळा, डाळिंब आदी फळपीक लागवडीचा समावेश आहे. त्यात भरघोस अनुदान उपलब्ध असून, वैयक्तिक शेतकऱ्यांना लाभ देण्यात येतो. त्यामुळे यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.

Fruit Crop
Orchard Crisis : दोन बहर, दोन वेळा दिलेल्या ताणांमुळे बागांवर संकट

फळ पिकाला तीन वर्षांत अनुक्रमे ५०, ३० आणि २० टक्के याप्रमाणे अनुदान वाटप होते. तीन वर्षांत एकूण देय अनुदान आंबा पिकासाठी ७१ हजार ९९७ रुपये, पेरू कलमांसाठी ७७ हजार ६९२ रुपये, संत्रा-मोसंबीसाठी ८९ हजार २७५ रुपये, कागदी लिंबू रोपांसाठी ७२ हजार ६५५ रुपये, सीताफळ कलमे ९१ हजार २५१ रुपये, आवळा ६३ हजार ६४० रुपये व डाळिंबासाठी एक लाख २६ हजार ३२१ रुपये अनुदान आहे.

Fruit Crop
Mosambi Orchard : दरवाढीअभावी मोसंबी बागांवर कुऱ्हाड

जिल्ह्यातील ओलिताची सोय असणा-या शेतकऱ्यांनी-यांना योजनेचा लाभ मिळतो. कृषी विभागाच्या https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी बंधनकारक आहे. वैयक्तिक शेतकऱ्यांना लाभ घेता येईल.

संकेतस्थळावर पूर्वसंमतीसाठी घटकांतर्गत लक्ष्यांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास अर्जांची निवड ऑनलाइन लॉटरी पद्धतीने करण्यात येईल. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फळबाग लागवड योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. योजनेविषयी अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क करावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com