Mosambi Orchard : दरवाढीअभावी मोसंबी बागांवर कुऱ्हाड

Mosambi Rate : कोरडवाहू असलेल्या बीड जिल्ह्यात मोठ्या हिमतीने शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग करण्यासाठी धडपडतो. काही वेळा निसर्ग व बाजारातील शेतमालाच्या भावाची स्थिती साथ देते.
Mosabi Orchard
MosambiAgrowon
Published on
Updated on

Beed News : कोरडवाहू असलेल्या बीड जिल्ह्यात मोठ्या हिमतीने शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग करण्यासाठी धडपडतो. काही वेळा निसर्ग व बाजारातील शेतमालाच्या भावाची स्थिती साथ देते. मात्र अनेकदा शेतकऱ्यांच्या नशिबी अपयश पडत आहे.

जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांपुढे यंदाही असेच संकट उभा ठाकले आहे. गेल्या काही वर्षांपासून एखादा अपवाद वगळला तर १५ ते २० रुपयांपुढे भाव मिळत नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांवर या बागांवर कुऱ्हाड चालविण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

बीड जिल्ह्यात पारंपरिक पिकांसोबत चांगला आर्थिक मोबदला देतील, अशा पिकांच्या शोधात शेतकरी असतात. गेल्या काही वर्षांत कापस, सोयाबीनचे भाव कोलमडलेले आहेत. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन करत फळबागा घेण्यास सुरवात केली. मात्र, या फळबागांसाठी मोठी मेहनत घेऊनही पदरी अपयश पडत आहे.

Mosabi Orchard
Mosambi Farming Management : मोसंबीतील आंबिया बहराचे व्यवस्थापन

सध्यस्थितीत मोसंबीला चांगला बाजारभाव मिळत नसल्यामुळे अनेक शेतकरी बागा तोडून टाकत आहेत. मोसंबीला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने उत्पादन खर्चही निघत नाही. या फळपिकावर खत, पाणी, मजुरी यासाठी मोठा खर्च होतो. भाव कमी असल्यास तो खर्च भरून निघत नाही. याशिवाय बहुतांशी शेतकऱ्यांना सरळ ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा पर्याय नाही, ती नसल्यामुळे शेतकरी मोसंबी बागा तोडण्याच्या शेवटच्या पर्यायावर येऊन ठेपले आहेत.

Mosabi Orchard
Mosambi Pest Infestation : मोसंबीवर कोळी किडीचा प्रादुर्भाव

जेसीबीने तोडली ७५० झाडे

धुनकवाड येथील प्रगतशील शेतकरी कल्याण कुलकर्णी यांनी आठ वर्षांपूर्वी मोसंबीची बाग फुलविली. गेल्या काही वर्षांपासून मोसंंबीचा भाव हा १५ ते २० रुपयांदरम्यानच अडकून आहे. त्यामुळे उत्पादनासाठी केलेला खर्चही निघेनासे झाले. अखेर कुलकर्णी यांनी दोन दिवसांपूर्वी ही ७५० झाडे जेसीबी लावून तोडून टाकली. या नुकसानीमुळे शेतकरी कुलकर्णी हे व्यथित झाले.

जिल्ह्यात शेतकरी नवनवीन प्रयोग करत आहेत. किमान शासनाने आता या अवर्षणग्रस्त जिल्ह्यासाठी शेतीआधारित प्रक्रीया उद्योग उभारावेत. आजच प्रक्रीया उद्योग असता तर मला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली साडेसातशे झाडे तोडण्याची वेळ आली नसती. लोकप्रतिनिधींनी या विषयांकडे लक्ष देण्याची गरज आहे.
-कल्याण कुलकर्णी, शेतकरी, धुनकवाड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com