Orchard Cultivation : सोलापूर जिल्ह्यात २५०० हेक्टरवर फळबागेसाठी उद्दिष्ट

Agriculture Department : सोलापूर जिल्ह्यात फळबाग लागवडीसाठी यंदा अडीच हजार हेक्टरचे उद्दिष्ट मिळाले असून, राज्याच्या कृषी विभागाने त्यास मंजुरी दिली आहे.
Orchard
OrchardAgrowon
Published on
Updated on

Solapur News : सोलापूर जिल्ह्यात फळबाग लागवडीसाठी यंदा अडीच हजार हेक्टरचे उद्दिष्ट मिळाले असून, राज्याच्या कृषी विभागाने त्यास मंजुरी दिली आहे. आगामी काळात पडणाऱ्या पावसावर लागवडीचे गणित ठरणार आहे. जिल्ह्यात उसाचे क्षेत्र अलीकडच्या काही वर्षात कमी होत असून, फळबाग लागवडीकडे कल वाढला आहे. फळबागेसाठी हेक्टरी सव्वालाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळते.

जिल्ह्यातील सांगोला, करमाळा, माढा, माळशिरस, पंढरपूर, मोहोळ या तालुक्यांमध्ये सर्वाधिक फळबागांचे प्रमाण आहे. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी या तालुक्यांमध्ये देखील ज्या ठिकाणी पाणी मुबलक आहे, तेथे फळबागा विशेषत: द्राक्ष, केळी वाढत आहे. राज्याच्या कृषी विभागाने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यासाठी अडीच हजार हेक्टरवरील फळबाग लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे.

Orchard
Orchard Cultivation : फळबाग लागवडीत ४१८ हेक्टरने घट

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने यांनी तालुकानिहाय उद्दिष्ट वाटप केले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्यासाठी तालुका कृषी कार्यालयात अर्ज करावेत, असे आवाहन केले आहे. योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावावर किमान दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र नसावे, अशी अट आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रम राबविला जातो.

Orchard
Orchard Cultivation : ‘मनरेगा’अंतर्गत फळबाग लागवडीत कृषी विभाग अव्वल

त्यासाठी शेतकऱ्यांना तालुका स्तरावरील कृषी कार्यालयाकडे अर्ज करावा लागतो. त्यावेळी अर्जासोबत लाभार्थी शेतकऱ्याकडे रोजगार हमीचे जॉब कार्ड, ग्रामपंचायतीचा ठराव, सातबारा व आठ-अ उतारा, आधारकार्ड लिंक असलेल्या बॅंकेचे पासबुक, स्वत:चे आधारकार्ड, अशी कागदपत्रे जोडावी लागतात. अर्जाची छाननी होऊन मंजुरी दिली जाते. मंजुरी मिळाल्यावर ७५ दिवसांत कलमे रोपे आणून लागवड करायची असते. त्यानंतर कृषी अधिकारी स्थळ पाहणी करून तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी देतात. त्यानंतर शासनाच्या अनुदानाची प्रक्रिया पार पडते.

ड्रॅगन फ्रूट, अॅव्हाकॅडोचाही समावेश

फळबाग लागवड योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याला प्रतिहेक्टर सरासरी सव्वा लाखांपर्यंत अनुदान मिळते. या योजनेत आंबा, डाळिंब, बोर, शेवगा, चिक्कू, पेर, आवळा, सीताफळ, लिंबू, नारळ, जांभूळ अशी पिके पूर्वीपासूनच आहेत. आता २०२२ पासून नव्याने द्राक्ष, केळी, ड्रॅगन फ्रूट आणि ॲव्हाकॅडोसारखी फळपीकेही समाविष्ट झाली आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com