
Shivrajsingh Chouhan : ब्राझील येथील ब्रासीलियामध्ये आयोजित ब्रिक्समध्ये केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान १७ एप्रिल रोजी सहभागी होणार आहेत. ब्रिक्समध्ये कृषिमंत्र्यांची १५ वी बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत ब्रिक्स देशांसोबत सहकार्य आणि व्यापारी संबंधातून कृषि क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचा अजेंडा ठेवण्यात आला आहे. यामध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमराती, इथियोपिया, इंडोनिशियासह अन्य देशांचे कृषिमंत्री व वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत.
ब्राझीलमधील प्रमुख कृषी उद्योगांच्या प्रतिनिधीसह वनस्पती तेल उद्योग संघाशी कृषिमंत्री चौहान चर्चा करणार आहेत. तसेच कृषी क्षेत्रातील मूल्यसाखळीसाठी भागीदारी आणि गुंतवणूसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच ब्राझीलमधील भारतीय दूतावासाकडून 'एक झाड आईच्या नावाने' अशी संकल्पनातून पर्यायवरण संवर्धनाचा संदेशही देण्यात येणार आहे.
ब्राझीलचे कृषी आणि पशुसंवर्धन मंत्री कार्लोस हेनरिक बैकेटा फेवरो आणि कृषी विकासमंत्री लुईज पाउलो टेक्से यांच्यासोबत या दौऱ्यात चर्चाही करणार आहेत. तसेच कृषी, कृषी उद्योग, ग्रामीण विकास आणि अन्नसुरक्षा अशा विविध मुद्यांवर भारत आणि ब्राझीलमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी चर्चा केली जाणार आहे.
दरम्यान, अलीकडेच केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ९ एप्रिल रोजी नेपाळ दौरा केला. यामध्ये काठमांडू येथे आयोजित बिम्सटेक कृषी मंत्रिस्तरीय बैठक चर्चा केली. यामध्ये भारत, बांगलादेश, भुतान, नेपाळ, म्यानमार, थायलंड, श्रीलंका या देशातील कृषिमंत्री आणि अधिकारी हजर होते. या बैठकीतही क्षेत्रीय सहकार्यावर चर्चा झाली.
बिम्सटेक कृषी आणि अन्नसुरक्षावर सहकार्य करणाऱ्या देशांचं संघटन आहे. यामध्ये बीएमएमची पहिली बैठक २०१९ मध्ये म्यानमार येथे झाली. तर दुसरी बैठक २०२२ मध्ये भारतात आयोजित करण्यात आली. तसेच तिसरी बैठक नुकतीच नेपाळमध्ये आयोजित करण्यात आली होती. यामध्ये कृषी, मत्स्यव्यवसाय आणि पशुधन सहकार्य यावर कृषीमंत्र्यांनी चर्चा केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.