sustainable Agriculture : शेतकऱ्यांना मिळाले शाश्‍वत शेतीचे धडे

Agrowon 20th Annivarsery : अॅग्रोवनच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या शाश्‍वत शेती परिषदेला सकाळपासूनच शेतकऱ्यांचा ओघ सुरू होता. राज्याच्या वेगवेगळ्या भागातून शेतकरी आवर्जून आले होते.
Agrowon Sustainable Framing Summit
Agrowon Sustainable Framing SummitAgrowon
Published on
Updated on

Pune News : येथील यशदा येथे ‘अॅग्रोवन’चा विसावा वर्धापन दिन सोहळा उत्साही वातावरणात रविवार (ता. २०) पार पडला. यानिमिताने शाश्‍वत शेती परिषद आयोजिण्यात आली होती. यातून अनुभवी शेतकरी, तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना शाश्‍वत शेतीचे जणू धडे मिळाले. तसेच या कार्यक्रमाने शाश्‍वत शेतीसाठी आवश्यक नवीन माहिती, नवीन तंत्रज्ञान जाणून आलेले शेतकरी भारावून गेले.

अॅग्रोवनच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या शाश्‍वत शेती परिषदेला सकाळपासूनच शेतकऱ्यांचा ओघ सुरू होता. राज्याच्या वेगवेगळ्या भागातून शेतकरी आवर्जून आले होते. परिषदस्थळी आगमन होताच, शेतकरी आपल्या उपस्थितीची नोंदणी स्टॉलवर करून घेत होते.

Agrowon Sustainable Framing Summit
Sustainable Agriculture : शाश्‍वत एकात्मिक शेतीकडे जावेच लागेल

प्रवेशद्वारावर शेतीविषयक विविध पुस्तकाच्या स्टॉलला भेट देऊन शेतकरी खास पुस्तकांची खरेदी करत होते. त्याशिवाय परभणीच्या वरपूडहून विविध वाणांचे खास आंबे घेऊन आलेल्या चंद्रकांत देशमुख यांच्या स्टॉलला भेट देऊन शेतकरी त्यांच्या आंब्यांविषयी चौकशी आणि चर्चा करत होते. त्यांचे संपर्क क्रमांक घेत होते.

Agrowon Sustainable Framing Summit
Sustainable Agriculture: शेतीची शाश्‍वती कशी साधायची?

उद्‌घाटनसत्राच्या मुख्य कार्यक्रमानंतर शेती-मातीचे शाश्‍वत संवर्धन आणि बाजारांच्या दाही दिशा ही दोन चर्चासत्रे झाली. त्यातले अनुभव नावीन्यपूर्ण आणि शेतकऱ्यांना प्रेरणा देणारे ठरले.

अनेक शेतकरी या चर्चासत्रात विविध विषयांच्या तज्ज्ञांचे महत्त्वपूर्ण असलेल्या अनुभवाचे व्हिडिओ मोबाइलमध्ये रेकॉर्डिग व नोंदवहीत नोंदी करून घेत होते. या चर्चासत्रामध्ये प्रश्‍न-उत्तरेही झाली. त्यात उपस्थित मान्यवरांनी प्रश्‍नांचे निरसन केले. परिषदेचे सूत्रसंचालन वसुंधरा काशीकर यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com