Diwali Ank Award: अॅग्रोवनच्या दिवाळी अंकाला सर्वोत्कृष्ट विशेष दिवाळी अंक पुरस्कार

Chhandashree Award:‘छंदश्री’ आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक स्पर्धेत अॅग्रोवनच्या दिवाळी अंकाला सर्वोत्कृष्ट विशेष दिवाळी अंकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच ‘सकाळ’च्या ‘अवतरण’ दिवाळी अंकाने सर्वोत्कृष्ट निर्मितीसह सर्वोत्कृष्ट अंकाचा पुरस्कार पटकावला.
Diwali Ank 2025
Diwali Ank 2025Agrowon
Published on
Updated on

Pune News: ‘छंदश्री’ आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक स्पर्धेत अॅग्रोवनच्या दिवाळी अंकाला सर्वोत्कृष्ट विशेष दिवाळी अंकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच ‘सकाळ’च्या ‘अवतरण’ दिवाळी अंकाने सर्वोत्कृष्ट निर्मितीसह सर्वोत्कृष्ट अंकाचा पुरस्कार पटकावला. तर वैशिष्ट्यपूर्ण निर्मितीचा द्वितीय क्रमांक कोल्हापूरच्या `सकाळ` दिवाळी अंकाला मिळाला आहे.  

स्व. कमलाबाई रसिकलाल धारिवाल पुरस्कृत ‘छंदश्री आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक स्पर्धेत विविध १७ विभागांमध्ये एकूण ४२ पुरस्कार देण्यात येणार आहेत. मंगळवारी (ता. १) पुण्यातील टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या सभागृहात सायंकाळी पाच वाजता पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होणार आहे.

Diwali Ank 2025
Agrowon Diwali Ank : ‘अॅग्रोवन’च्या दिवाळी अंकाचे कृषिमंत्र्यांच्या हस्ते थाटात प्रकाशन

प्रसिद्ध अभिनेत्री, लेखिका निशिगंधा वाड या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आहेत. माणिकचंद उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा प्रकाश धारिवाल, मसापचे अध्यक्ष मिलिंद जोशी, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे यावेळी उपस्थित राहणार आहेत.

सकस आणि वाचनीय दिवाळी अंकाची परंपरा हे ॲग्रोवनचे वैशिष्ट्य आहे. ॲग्रोवनचा प्रत्येक दिवाळी अंक एका विशिष्ट संकल्पना केंद्रस्थानी ठेऊन काढला जातो. यंदाच्या अंकात पशुधन क्षेत्राचा सांगोपांग आढावा घेतला आहे. एक अभ्यासपूर्ण, वाचनीय आणि संग्राह्य दस्तऐवज ठरलेल्या या अंकाचे सर्व स्तरातून स्वागत झाले. या अंकावर आता `छंदश्री`च्या पुरस्काराची मोहर उमटली आहे.

Diwali Ank 2025
Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

या स्पर्धेत व्यंगचित्र, मुखपृष्ठ, बालकुमार दिवाळी अंक, अनुवाद, ललित, वैचारिक, दीर्घकथा, लघुकथा, कविता, वैशिष्ट्यपूर्ण निर्मिती, आरोग्य, परदेशस्थ, समाज विशेष, उल्लेखनीय, लक्षवेधी, उत्कृष्ट निर्मिती, सोर्वोत्कृष्ट दिवाळी अंक आदी विभागांतील पुरस्कारार्थींचा गौरव होणार आहे.

पुण्यात अंकांचे प्रदर्शन

बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात १ ते ४ जुलैदरम्यान वैविध्यपूर्ण दिवाळी अंकाचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. उद्योगपती प्रकाश धारिवाल यांची प्रमुख उपस्थिती असेल. दिवाळी, ख्रिसमस आणि रमझानच्या निमित्ताने प्रकाशित झालेले अंकही या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com