Agri Officers Support: कृषिमंत्र्यांच्या समर्थनासाठी कृषी अधिकारी सरसावले

Support For Manikrao Kokate: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या समर्थनार्थ राज्यातील विविध कृषी अधिकारी संघटनांनी खुले पत्र प्रसिद्ध करत ठाम पाठिंबा दर्शविला आहे. मात्र, त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांवरून उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमध्ये नाराजीची भावना आहे.
Manikrao Kokate
Manikrao KokateAgrowon
Published on
Updated on

Pune News: कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांच्या कारभाराचे कृषी विभागातील क्षेत्रीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी उघड समर्थन केले आहे. ‘‘तुमच्यामुळेच कृषी विभाग व शेतकऱ्यांची प्रगती होत असल्यामुळे तुम्हाला आमचे समर्थन आहे,’’ अशा शब्दांत या संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

मंत्रिमंडळातून कोणत्याही क्षणी गच्छंती होण्याच्या वाटेवर असलेल्या कृषिमंत्री कोकाटे यांना शेतकरी सोडाच, त्यांच्या पक्षातूनही पाठिंबा मिळालेला नाही. मात्र अलीकडेच क्षेत्रीय संघटनांकडून त्यांच्या समर्थनार्थ एकापाठोपाठ एक पत्र जारी केले जात आहे. महाराष्ट्र राज्य कृषी अधिकारी संघटनेने कृषिमंत्र्यांकडून धाडसी व राज्याच्या कृषी प्रगतीसाठी उपयुक्त ठरणारे निर्णय घेत असल्याचे नमूद केले आहे.

Manikrao Kokate
Manikrao Kokate Controversy: कृषिमंत्री धाडसी आणि चांगले निर्णय घेणारे; कृषी कर्मचारी संघटनांचा कोकाटेंना पाठिंबा

‘‘प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाणे, कृषी विद्यापीठांना भेटी देणे, कृषी संशोधन केंद्रांच्या अडचणी समजावून घेणे, कृषी विभागाच्या कार्यशाळांना हजेरी लावणे या माध्यमातून श्री. कोकाटे यांनी कृषी विभागाला दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. कृषी विभागासाठी नवा आकृतिबंध, गुणनियंत्रण विभागाच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण, कृत्रिम बुद्धिमत्ता वापर तसेच शेतकऱ्यांना चांगली सेवा व निधी मिळण्यासाठी श्री. कोकाटे यांनी घेतलेले निर्णय स्तुत्य होते. त्यामुळे तुमच्या चांगल्या वाईट काळात शेतकरी हितासाठी आमची संघटना सतत कार्यरत राहील,’’ अशा शब्दांत कृषी अधिकाऱ्यांच्या संघटनेने पाठिंबा दिला आहे.

महाराष्ट्र राज्य सहायक कृषी अधिकारी संघटनेने श्री. कोकाटे यांच्या काळात शेतकऱ्यांसाठी ५२ वेगवेगळे निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले आहे. नैसर्गिक शेती अभियान, अॅग्रीस्टॅक, सुधारित पीकविमा, कृषी समृद्धी योजना, सत्यप्रत बियाण्यांसाठी साथी पोर्टल, कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आंतरवासिता, कृषी धोरणाच्या अभ्यासासाठी सरंगी समितीची नियुक्ती, कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण तसेच ग्रामपंचायत स्तरावर हवामान केंद्र स्थापन करणे असे अनेक निर्णय श्री. कोकाटे यांच्यामुळेच झाले आहेत. त्यामुळे राज्यातील ११ हजार ५०० अधिकारी तुमच्या सोबत आहेत, असे या संघटनेने कृषिमंत्र्यांना लिहिलेल्या ताज्या पत्रात म्हटले आहे.

Manikrao Kokate
Manikrao kokate Controversy: रमी खेळा आणि माझ्यासाठी पैसे जिंका; शेतकऱ्याने कृषिमंत्र्यांना मनी ऑर्डर पाठवली

महाराष्ट्र राज्य उपकृषी अधिकारी संघटनेनेगी कोकाटे यांच्या कामकाजाचे समर्थन केले आहे, श्री. कोकाटे यांनी कृषी विभागाला नवी दिशा दिली, असे त्यांनी म्हटले आहे. ‘तुम्ही केलेल्या उत्तम कार्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. तुमच्या नेतृत्वावर आमचा पूर्ण विश्‍वास आहे. त्यामुळे आम्ही तुमचे समर्थन करीत असून प्रलंबित कामे मार्गी लागतील,’ अशी अपेक्षा या संघटनेने व्यक्त केली.

उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली नाराजी

कृषिमंत्री कोकाटे यांनी केलेली वादग्रस्त वक्तव्य व विधिमंडळात ते जंगली रमी खेळत असल्याबाबत झालेला आरोप या पार्श्‍वभूमीवर वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांनी श्री. कोकाटे यांच्यापासून चार हात दूर राहणे पसंत केले आहे. ‘‘श्री. कोकाटे सध्या राजकीय वादात आहेत. त्यात अधिकाऱ्यांनी उडी घेत त्यांचे समर्थन करणे प्रशासकीयदृष्ट्या अयोग्य आहे. त्यांनी पदनाम बदलून दिले म्हणून हुरळून न जाता आपणच कार्यकर्त्यांसारखे त्यांचे समर्थन करणे सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय संकेतात बसत नाही,’’ अशा शब्दांत एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने नाराजी व्यक्त केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com