Agriculture Department : कृषी विभागाचे संकेतस्थळ बंद

Agriculture Department Website Down : ऑनलाइन कामकाजाच्या गप्पा ठोकणाऱ्या कृषी विभागाला स्वतःचेच संकेतस्थळ चालविणे अवघड झाले आहे. गेल्या आठवड्यापासून राज्यस्तरीय संकेतस्थळ बंद असून, नेमका बिघाड काय झाला, याविषयी अधिकारी वर्गही संभ्रमात आहेत.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon
Published on
Updated on

Pune News : ऑनलाइन कामकाजाच्या गप्पा ठोकणाऱ्या कृषी विभागाला स्वतःचेच संकेतस्थळ चालविणे अवघड झाले आहे. गेल्या आठवड्यापासून राज्यस्तरीय संकेतस्थळ बंद असून, नेमका बिघाड काय झाला, याविषयी अधिकारी वर्गही संभ्रमात आहेत.

कृषी आयुक्तालयाच्या संगणक विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले, की http://krishi.maharashtra.gov.in/ हे कृषी विभागाचे अधिकृत संकेतस्थळ आहे. पूर्वी त्यात दोष असल्यामुळे जलद माहिती मिळत नव्हती. परंतु गेल्या काही महिन्यात तांत्रिक सुधारणा केल्या गेल्या असून, ते अद्ययावत करण्यात आले आहे. अलीकडेच या संकेतस्थळाचा वापरदेखील वाढलेला आहे. अर्थात, गेल्या आठवडाभरापासून ते उघडत नसल्याची बाब खरी आहे. त्यातील तांत्रिक दोष दूर करण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे.

Agriculture Department
Agriculture Department : कृषी विभागातील तंत्र अधिकाऱ्याला लाच प्रकरणी अटक

एका जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याने सांगितले, की सर्व सेवा ऑनलाइनवर आणल्याची फुशारकी करणाऱ्या कृषी विभागाला स्वतःचीच संगणक शाखा बळकट करता आलेली नाही. या विभागात उच्चशिक्षित मनुष्यबळ व नव्या आवृत्तीची साधने नाहीत. गुणनियंत्रण खात्यात घुसण्यासाठी धडपड चालू असलेले अधिकारी संगणक शाखेत काम करण्यास तयार नसतात.

त्यामुळे या शाखेचे पालकत्व परिपूर्ण संगणकीय ज्ञान असलेल्या अधिकाऱ्याकडे जात नाही. गेल्या आठवडाभरापासून संगणकीय प्रणाली ठप्प आहे. मात्र आयुक्तालयाला दोष दूर करता आलेला नाही. त्यामुळे राज्यातील रब्बी पीकपेरण्यांची माहितीदेखील संकलित झालेली नाही. आयुक्तालयाकडून थातूरमातूर कारणे सांगून वेळ मारून नेली जात आहे.

Agriculture Department
Agriculture Department Kolhapur : सव्वा लाख शेतकऱ्यांना मिळणार पीक कर्जाचे २२ कोटींचे व्याज

दरम्यान, एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, संकेतस्थळ बंद पडण्यामागे कंत्राटदार संस्थेचे अडकलेले बिल कारणीभूत असल्याचा संशय आहे. कृषी विभागाचे संकेतस्थळ असले, तरी त्याचे व्यवस्थापन राज्य शासनाच्या इतर विभागाकडून होते. या विभागाकडून पुन्हा कंत्राटी पद्धतीने तांत्रिक सेवा घेतल्या जातात. खासगी संस्थांची बिले अडवून ठेवण्याची पद्धत असल्यामुळे त्याचा फटका अधूनमधून कृषी विभागाला बसत असतो.

क्षेत्रीय अधिकारीही वैतागले

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, संगणक प्रणाली बंद असल्यामुळे पीकपेऱ्याची माहिती संकलित करणारी ‘महाअॅग्री’ व्यवस्थादेखील विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याकडे ‘स्प्रेडशीट’ पाठवून पीकपेऱ्याचे आकडे गोळा केले जात आहेत. या गोंधळात क्षेत्रीय पातळीवर ताळमेळ राहिलेला नाही. वरिष्ठ नाराज होऊ नयेत म्हणून वैतागलेले अधिकारी अंदाजे आकडेवारी भरण्यात धन्यता मानू लागले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com