Mahaonline Portal : ‘महाऑनलाईन’ संकेतस्थळ बंद

Digital Satbara : सध्या सगळीकडे शैक्षणिक प्रवेशाची धावपळ सुरू असल्याने शासनाच्या महाऑनलाईन संकेतस्थळाने मात्र राज्यभरातील पालक, विद्यार्थ्यांना त्रस्त करून सोडले आहे.
Digital Satbara
Digital SatbaraAgrowon
Published on
Updated on

Nagar News : सध्या सगळीकडे शैक्षणिक प्रवेशाची धावपळ सुरू असल्याने शासनाच्या महाऑनलाईन संकेतस्थळाने मात्र राज्यभरातील पालक, विद्यार्थ्यांना त्रस्त करून सोडले आहे. गेल्या आठ दिवसांपासून हे संकेतस्थळ बहुतांश वेळा बंदच असून कामकाज विस्कळीत झाल्यासारखे झाले आहे.

कधीतरी संकेतस्थळ चालू झाले तरी कागदपत्रांची पूर्तता होत नाही. शालेय प्रवेशासाठी वेळेत प्रमाणपत्रे, कर्जप्रकरणासाठी तलाठ्याकडून डिजिटल सातबारे मिळत नाहीत. शेतीच्या इतर कामासाठी लागणारे कागदपत्रेही मिळेनासे झाल्याने अडचणी निर्माण होत आहे.

नागरिकांना सरकारी कागदपत्रे मिळवण्यासाठी होणारा त्रास कमी करण्यासाठी बहुतांश कागदपत्रे आता ऑनलाइन देण्याची व्यवस्था केली आहे. त्यासाठी महसुल विभागाचे ‘महाऑनलाईन’ हे संकेतस्थळ विकसित केलेले आहे. सेतू सुविधा केंद्रातून नागरिकांना जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेअर, उत्पन्न, डोमिसाईल आदी प्रमाणपत्रासह विविध कारणांसाठी लागणारी प्रतिज्ञापत्रे ‘महाऑनलाईन’ हे संकेतस्थळावरुन काढून दिली जातात.

Digital Satbara
Indian Agriculture News: मराठवाड्यातले तरूण शेतकरी प्रयोगशील आहेत का ?

सध्या शैक्षणिक प्रवेश सुरू आहेत. त्यासाठी लागणारे प्रमाणपत्रे काढण्यासाठी विद्यार्थी, पालकांची धावपळ सुरू आहे, मात्र आठ दिवसांपासून हे संकेतस्थळ सातत्याने बंद पडत असल्याने यावरील कामकाज विस्कळीत झाले आहे. प्रमाणपत्रे मिळण्यासाठी विद्यार्थी, पालकांच्या सेतू केंद्रात चकरा सुरू आहेत.

संकेतस्थळ बंद आहे, मात्र त्याला वरूनच अडचण आहे. नेमके कधी सुरळीत सुरू होईल सांगत येत नाही असे महसुलचे अधिकारी सांगतात. पण याबाबत अधिक कोणाही बोलत नाही. शैक्षणिक प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे वेळेत मिळतील का याबाबत मात्र विद्यार्थी, पालक चिंतेत असल्याचे दिसतेय.

Digital Satbara
Agriculture Warehouse : शेतीमाल साठवणुकीतून वाढवले नफ्याचे प्रमाण

विस्कळीत सेवेमुळे त्रास

नगर जिल्ह्यातील एका सेतू चालकाने सांगितले की, सध्या शालेय प्रवेशाचे दिवस सुरू आहे. त्यांना विविध शैक्षणिक कागदपत्रे वेळेत मिळणे गरजेचे असते. मात्र महाऑनलाईन संकेतस्थळ सतत बंद पडत असल्याने अडचणीला सामोरे जावे लागत आहे.

आम्ही प्रमाणपत्रे काढण्यासाठी लागणाऱ्या बाबी अपलोड केल्या तरी त्या होत नाही. उत्पन्नाचा दाखला काढल्यावर त्यावर डिजिटल सह्या येत नाहीत. विद्यार्थी, पालक सतत चकरा मारत असल्याने आम्हीही त्रस्त आहोत.

जुने खरेदी फेरफारही काढण्याला अडचणी

सरकारी व अन्य कामासाठी तलाठ्याकडून डिजिटल सातबारा देण्याचे काम सुरू आहे. हा डिजिटल सातबारा अनेक कामांसाठी ग्राह्य धरला जात आहे. मात्र आठ दिवसांपासून संकेतस्थळ बंद असल्याने तलाठ्याकडून डिजिटल सहा असलेला सातबारा, आठ अ उताराही मिळेनासा झाला आहे. याशिवाय शेतीचे जुने खरेदी फेरफारही काढण्याला अडचणी येत आहेत, असे एका तलाठ्याने सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com