
Nagpur News : अनुदानाचा उर्वरित हप्ता वितरित करण्यासाठी म्हणून दहा हजार रुपयांची लाच मागणाऱ्या कृषी विभागातील तांत्रीक सहायकास लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून अटक करण्यात आली. बुटीबोरी येथे ही कारवाई करण्यात आली.
अतुल शामसुंदर चिव्हाणे (वय ४२) असे अटक करण्यात आलेल्या लाचखोराचे नाव आहे. अतुल हा कृषी विभागाचा कर्मचारी असून, त्याची नागपूर पंचायत समितीत तांत्रिक सहायकपदी नियुक्ती आहे. रामचंद्र गोविंदराव कलवडे (वय ३५, रा. खर्डा, नागपूर) यांची सोनेगाव (लोधी, ता. नागपूर ग्रामीण) शिवारात शेती आहे.
त्यांनी त्यांच्या शेतात शासकीय योजनेच्या माध्यमातून मोहगणी वृक्षांची लागवड केली होती. त्यांना यासाठी आठ लाख ६३ हजार १२८ रुपयांचे अनुदान मंजूर झाले होते. त्यापैकी चार लाख रुपये त्यांच्या बॅंक खात्यात जमा झाले होते. अनुदानाचा दुसरा हप्ता जमा व्हावा, अशी अपेक्षा त्यांची होती. त्यानुसार त्यांनी अतुल चिव्हाणे यांच्याशी संपर्क साधला.
त्या वेळी अतुल यांनी दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. परंतु लाच द्यायची नसल्याने रामचंद्र कलवडे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याशी संपर्क साधला. त्यानंतर बुटीबोरी येथे पाच हजार रुपयांची लाच स्वीकारतांना अतुल चिव्हाणे यांना अटक करण्यात आली.
त्यांच्याकडून लाचेची रक्कम पाच हजार रुपये जप्त करण्यात आले. याप्रकरणी बुटीबोरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एलसीबीचे पोलिस अधीक्षक दिगंबर प्रधान, अपर पोलिस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक राकेश साखरक, महेश सेलोकर, सचिन किन्हेकर, प्रिया नेवरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.