Crop Advisory : कृषी सल्‍ला (मराठवाडा विभाग)

Agriculture Update : मराठवाडा विभागातील कृषी सल्ल्याबाबतची माहिती या लेखातून पाहुयात.
Agriculture
AgricultureAgrowon

Marathwada Division Agriculture Advisory :

तूर :

काढणीस तयार असलेल्या तूर पिकाची लवकरात लवकर काढणी करून घ्यावी. काढणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

हरभरा :

मागील चार दिवसांत वाढलेले कमाल तापमान व पुढील सात दिवसांच्या कोरड्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता, हरभरा पिकास मध्यम जमिनीत ४० ते ५० दिवसांनी दुसरे आणि ६५ ते ७० दिवसांनी तिसरे पाणी द्यावे. पाणी दिल्यानंतर शेतात पाणी साचू देऊ नये राहणार नाही, याची काळजी घ्यावी, अन्यथा मूळकुजव्या रोगाने पिकाचे नुकसान होते.

मागील तीन दिवसांतील ढगाळ वातावरणामूळे, हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यांच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी ‘T’ आकाराचे पक्षिथांबे प्रति एकर २० या प्रमाणात लावावेत. घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी २ कामगंध सापळे लावावेत.

हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा ॲझाडिरॅक्टिन (१००० पीपीएम) २ ते ३ मि.लि. किंवा क्विनॉलफॉस (२५ टक्के ईसी) २ मि.लि. किंवा इमामेक्टीन बेन्झोएट (५ टक्के) ०.४५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

Agriculture
Agriculture Advisory : कृषी सल्ला : कोकण विभाग

हळद

हळद पिकाच्या काढणीस साधारणत: फेब्रुवारी महिन्यात सुरुवात होते. काढणी करण्यापूर्वी पंधरा दिवस आधी पिकाला पाणी देणे बंद करावे.

उन्हाळी तीळ

उन्हाळी तीळ पिकाची पेरणी ३० × १० सें.मी. किंवा ४५ × ७.५ सें.मी. अंतरावर ३ ते ४ सें.मी. खोलीवर करावी. बी जास्त खोल पेरल्यास उगवण कमी होते. पेरणीसाठी हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे.

संत्रा/मोसंबी मृग बहर धरलेल्या संत्रा/मोसंबी फळबागेत फळाचा आकार वाढण्यासाठी ००:५२:३४ हे विद्राव्य खत १.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

दुपारचे वाढते कमाल तापमान लक्षात घेता बागेस आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.

मृग बहर धरलेल्या लिंबूवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा ॲझाडिरेक्टीन (१० हजार पीपीएम) ३ ते ५ मि.लि. प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी. रासायनिक नियंत्रणासाठी डायकोफॉल (१८.५ ईसी) २.७ मि.लि. किंवा डायफेन्थ्यूरॉन (५० डब्ल्यूपी) २ ग्रॅम किंवा विद्राव्य गंधक ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. आवश्‍यकता असल्यास दुसरी फवारणी १५ दिवसांच्‍या अंतराने करावी.

Agriculture
Crop Advisory : कृषी सल्ला (मराठवाडा विभाग)

भाजीपाला

भाजीपाला पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

भाजीपाला पिकात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

वांगे भाजीपाला पिकात शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. प्रादुर्भावग्रस्त शेंडे व फळे गोळा करून नष्ट करावेत. किडीच्या सर्वेक्षणासाठी शेतात एकरी २ कामगंध सापळे लावावेत.

नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी

क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ टक्के एससी) ०.४ मि.लि. किंवा क्लोरपायरिफॉस (२० टक्के एससी) २ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

डॉ. कैलास डाखोरे, ७५८८९९३१०५

प्रा. डी. डी. पटाईत, ७५८८०८२०४०

(ग्रामीण कृषी मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com